कॉलेज मध्ये जात असतांना रस्त्यात अडवुन तरुणीवर बलात्कार करणाऱ्या दोन्ही आरोपीस 10 वर्ष सश्रम कारावास

कॉलेज मध्ये जात असतांना रस्त्यात अडवुन तरुणीवर बलात्कार करणाऱ्या दोन्ही आरोपीस 10 वर्ष सश्रम कारावास व एकुन 2,74,000/- हजार रुपये द्रव्यदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली.

• मा. विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश, गडचिरोली श्री. उत्तम एम. मुधोळकर यांचा न्यायनिर्णय

सविस्तर वृत्त असे आहे की, पोलीस स्टेशन कुरखेडा येथे दि. ०७/०३/२०१८ रोजी फिर्यादी (पीडीता) मुलगी वय २३ वर्षे हीने फिर्याद दिली की, ती दि. ०३/०३/२०१८ रोजी मौजा बेलगाव (स्वगाव) वरून सकाळी ११.०० वा. नेहमीप्रमाणे कॉलेजमध्ये कुरखेडा येथे सायकलने जात असतांना बेलगाव ते नवरगाव रोडवर आरोपी नामे १) प्रशांत उमाजी जोगे, वय ३२ वर्षे २) रविंद्र सुमराज मडावी, २५ वर्षे यांनी पिडीतेचा पाठलाग करून पिडीतेला रस्त्यात अडवुन, दोघांनी सायकलवरून खाली पाडले व तिला एकाने तोंडावर रूमाल बांधुन, पिडीताचे तोंड दाबुन दुसऱ्या आरोपीने तिला उचलुन नेऊन, त्यांच्या जवळ असलेल्या दुचाकी वाहनावर बसवुन, बेलगाव ते मालदुगी या जंगल भागात कच्च्या रस्याने घेऊन गेले व ५० मिटर रोड पासुन जंगल भागात दुपारी १२.०० ते १२.३० वा. च्या सुमारास दोन्ही आरोपीने पिडीतेवर आतिप्रसंग करू लागले. तेव्हा पिडीताने प्रतिकार केला असता, आरोपी नामे रविंद्र सुमराज मडावी याने पिडीतेला दोन्ही हाताने पकडुन प्रशांत जोगे याने पिडीतेला टोकदार वस्तुने टोचुन जखमी केले व तिचे सोबत प्रशांत जोगे व रविंद्र मडावी याने जबरदस्तीने शारिरीक संबंध करून पिडीतेला हाताबुक्याने जोरदार मारहाण केली व तु जर आपल्या आई वडीलांना सांगितली, तर तुला व तुझ्या आई वडीलांना ठार मारून टाकीन अशी धमकी दिली. दोन्ही आरोपीने तिचे कपडे फाडत असतांना त्याचवेळी पिडीता ही त्याचे तावडीतुन सुटून रस्त्यावर येऊन एका अनोळखी मुलीच्या सहाय्याने आपले घरी पोहचुन आई वडीलांना हकिकत सांगीतली.

अशा फिर्यादीच्या (पिडीता) तोंडी रिपोर्ट वरून पोस्टे कुरखेडा दि. ०७/०३/२०१८ ला अप.क्र. ०३५/२०१८ अन्वये कलम ३४२, ३५४ (ड), ३६६, ३७६ (१), ३२३, ५०६, ३४ भादवी कायदयान्वये गुन्हा दाखल करून आरोपीस दिनांक ०८/०३/२०१८ रोजी अटक करून, तपास पूर्ण करून आरोपी विरुध्द सबळ पुरावा मिळून आल्याने मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करुन सेशन केस क्र. ५५/२०१८ नुसार खटला मा. सत्र न्यायालयात चालवुन फिर्यादी व वैद्यकीय पुरावा, ईतर साक्षीदारांचे बयाण तसेच सरकारी पक्षाचा युक्तीवाद मा. न्यायालयाने ग्राहय धरून दिनांक १७/०५/२०२४ रोजी आरोपी १) प्रशांत उमाजी जोगे, वय ३२ वर्षे, २) रविंद्र सुमराज मडावी, वय २५ वर्षे दोघेही रा. तळेगाव, तह. कुरखेडा, जि. गडचिरोली यांना मा. विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश, गडचिरोली श्री. उत्तम एम. मुधोळकर, यांनी आरोपीस प्रत्येकी कलम ३४२ मध्ये १ वर्ष व १०००/- रुपये, ३५४ (ड) मध्ये ०३ वर्ष व १०,०००/- रु, ३६६ मध्ये १० वर्ष व ५०,०००/- रु, ३७६ (१) मध्ये १० वर्ष व ५०,०००/- रु, ३२३ मध्ये १ वर्ष व १०००/- रु., ५०६ (२) मध्ये ५ वर्ष २५,०००/- रु. मध्ये दोषी ठरवुन वरील प्रमाणे सश्रम कारावास व एकुण 2,74,000/- हजार रूपये द्रव्यदंडाची शिक्षा ठोठावली. दंडाची रक्कम पिडीतेला देण्याचा आदेश पारित करण्यात आला. आरोपींनी सर्व शिक्षा हया एकत्रितपणे भोगण्याचा आदेश केला.

सरकार तर्फे जिल्हा सरकारी वकील श्री. अनिल एस. प्रधान यांनी कामकाज पाहीले, तसेच गुन्हयाचा तपास सहा. पोनि गजानन ज्ञानदेव पडळकर व पोउपनि. विजय वनकर, पोस्टे कुरखेडा यांनी केला. तसेच संबधीत प्रकरणात साक्षदारांशी समन्वय साधुन प्रकरणाची निर्गती करीता कोर्ट पैरवी अधिकारी व कर्मचारी यांनी कामकाज पाहिले.