न्यायालयीन बंदी मृत्युबाबत माहिती द्यावी-  उपविभागीय अधिकारी भंडारा

न्यायालयीन बंदी मृत्युबाबत माहिती द्यावी–  उपविभागीय अधिकारी भंडारा

 भडारा जिल्हा कारागृह येथील मृत न्या.बंदी क्र. 334/24 मिनाक्षी संजय वडीचार वय 40 वर्ष दिनांक 03.02.2024 रोजी सकाळी 11.30 ते 12.00 वाजताचे दरम्यान अचानकपणे प्रकृती बिघडल्यामुळे सामान्य रुग्णालय भंडारा येथे औषधोपचाराकरिता पाठविण्यात आले होते. परंतु उक्त नमुद या बंदीची प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नसल्यामुळे पुढील उपचाराकरिता दिनांक 08/02/2024 रोजी शासकीय मेडीकल कॉलेज व रुग्णालय, नागपुर येथील वैद्यकिय अधिकारी यांनी दिनांक 08/02/2024 रोजी सदर बंदीस सायंकाळी 4.35 वाजता मृत घोषीत केले.

सदर घटनेची दंडाधिकारीय चौकशी उपविभागीय दंडाधिकारी भंडारा यांचेमार्फत करण्याचे आदेश मा. जिल्हादंडाधिकारी भंडारा यांनी दिलेले आहे. त्याअनुषंगाने सदर प्रकरणाची सुनावणी सुरु करण्यात येत आहे. तरी याव्दारे जाहिररित्या सुचित करण्यात येते की, मृतक कैद्याची मृत्युबाबत प्रत्यक्ष माहिती असणा-या आणि चौकशीमध्ये भाग घेऊ इच्छिणा-यांनी सर्व माहिती व सत्य परिस्थितीबाबत लेखी शपथपत्रावर आपली माहिती स्वतः सुनावणीस हजर राहुन उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय भंडारा येथे दिनांक 02/04/2024 ते 15/05/2024 पर्यंत सादर करावी.