भंडारा जिल्ह्यात 6 लक्ष 5 हजार ‘मतदार माहिती चिठ्ठी’ चे वाटप

भंडारा जिल्ह्यात 6 लक्ष 5 हजार ‘मतदार माहिती चिठ्ठी’ चे वाटप

भंडारा दि. 12 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा ज्वर चांगलाच चढला आहे. 11 – भंडारा -गोंदिया लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पहिल्या टप्प्यात म्हणजे 19 एप्रिल 2024 रोजी होणार असून या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे ध्येय जिल्हा प्रशासनाने ठेवले आहे. त्याचाच एक भाग म्हणून नागरिकांच्या घरापर्यंत पोहचून ‘मतदार माहिती चिठ्ठी’ चे वाटप प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे. जिल्ह्यासाठी 9 लक्ष 96 हजार  923 ‘मतदार माहिती चिठ्ठी’ उपलब्ध झाल्या असून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सदर चिठ्ठी पोहचविण्यात येणार आहे.

          विधानसभा *मतदारसंघनिहाय ‘मतदार माहिती चिठ्ठी’ चे वाटप: भंडारा जिल्ह्यासाठी एकूण 9  लक्ष 96 हजार ‘ 923 मतदार माहिती चिठ्ठी’ उपलब्ध झाल्या असून यापैकी 6 लक्ष 5 हजार 315  चिठ्ठ्या विधानसभा मतदारसंघात वाटप करण्यात आले आहे. तसेच तुमसर  विधानसभा मतदारसंघात 1 लक्ष 93 हजार 401 , भंडारा  विधानसभा मतदारसंघात 2 लक्ष  18 हजार 448, साकोली  मतदारसंघात 1 लक्ष  93 हजार, 466  चिठ्ठ्या देण्यात आल्या असून तुमसर  विधानसभा मतदारसंघात 1 लक्ष 9 हजार 794, भंडारा  विधानसभा मतदारसंघात 1 लक्ष 51 हजार 505,व साकोली विधानसभा मतदारसंघात 1 लक्ष 30 हजार 309, मतदार माहिती चिठ्ठी वाटप करणे बाकी आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून आता बी.एल.ओ. मार्फत घरोघरी ‘मतदार माहिती चिठ्ठ्यांचे’ वाटप करण्यात येत आहे. उर्वरीत 3 लक्ष 91 हजार 608 मतदार माहिती चिठ्ठी 16 एप्रिल,  2024 पर्यत वाटप करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात असल्यांचे  नोडल अधिकारी तथा जिल्हा जलसंधारण अधिकारी सुभाष कापगते यांनी कळविले आहे.