कायदा व सुव्यवस्था निरीक्षक राजपाल सिंग यांचेकडून सुरक्षा यंत्रणेचा आढावा निवडणूकविषयक तक्रारीसाठी संपर्क करण्याचे आवाहन

कायदा व सुव्यवस्था निरीक्षक राजपाल सिंग यांचेकडून सुरक्षा यंत्रणेचा आढावा
निवडणूकविषयक तक्रारीसाठी संपर्क करण्याचे आवाहन

गडचिरोली दि. 29 : 12 – गडचिरोली-चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघासाठी दिनांक 20 मार्च रोजी अधिसूचना जाहिर झाल्यापासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. मतदार संघात निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक आयोगातर्फे कायदा व सुव्यवस्था निरीक्षक म्हणून पंजाब पोलिस दलाचे भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी श्री. राजपाल सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्री. राजपाल सिंग कालपासूनच जिल्ह्यात दाखल झाले व त्यांनी जिल्हा व पोलिस प्रशासनाकडून निवडणूक सुरक्षा यंत्रणेचा आढावा घेतला.
श्री. राजपाल सिंग यांचा भ्रमणध्वणी क्रमांक 9420068019 असा असून ते पोलीस विश्रामगृह, पोलीस रेस्ट हाऊस, गडचिरोली येथे सकाळी 11 ते 12 वाजेपर्यंत नागरिकांच्या सुचना / तक्रारी ऐकण्यासाठी उपलब्ध राहणार आहेत. कोणत्याही राजकीय पक्षांची, उमेदवारांची, नागरिकांची किंवा मतदाराची तक्रार असल्यास त्यांनी प्रत्यक्ष अथवा मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे त्यांचे संपर्क अधिकारी यांनी कळविले आहे.