स्वाब संस्थेच्या सर्पमित्रांनी दिले 10 फुट लांबीच्या अजगराला जीवदान.

स्वाब संस्थेच्या सर्पमित्रांनी दिले 10 फुट लांबीच्या अजगराला जीवदान.
तळोधी बाळापूर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या आलेवाही बीटातील आवळगाव येथे गावालगत असलेल्या शेतामध्ये काम सुरू असताना एक भला मोठा अजगर शेतमजुरांना दिसला त्यावेळेस त्यांनी त्याची सूचना ‘स्वाब नेचर केअर’ संस्थेच्या सर्पमित्रांना दिली.
यावेळेस या संस्थेच्या सर्पमित्र यश कायरकर व वेद प्रकाश मेश्राम यांनी मोक्याचा स्थळी जाऊन त्या 10 फुट लांबीच्या व 15 किलो वजनी अजगराला सुरक्षित रेस्क्यू केला. यावेळी त्यांनी उपस्थित शेतमजुरांना व शेतकऱ्यांना अजगरा बद्दल सांगताना बिनविषारी अजगर आणि विषारी घोणस यांच्यामधील फरक समजून सांगितला. “कारण घोणस प्रमाणेच अजगरही थोड्याफार प्रमाणात दिसत असल्यामुळे बहुतांश लोक त्याला विषारी घोणस समजून मारून टाकतात. असे करू नये अजगर हा संरक्षित प्राणी असून तो ‘शेड्युल वन’ मध्ये येत असल्याने त्याला वाचवणे गरजेचे आहे आणि अजगर हा माणसांना गिळून टाकतो अशा अफवा आहेत मात्र त्याचा कुठलाही आजपर्यंत ठोस पुरावा आपल्या भारतामध्ये आढळून आलेला नाही. त्यामुळे अजगराला मारणे चुकीचे आहे.तो अत्यंत कमी संखेत असल्यामुळे असा कुठलाही साप दिसला तर आम्हाला कळवा , मारू किंवा स्वतः पकडण्याचा प्रयत्न करू नका.” असा यावेळेस सर्पमित्र’ कायरकर यांनी गावातील लोकांना समजून सांगितले.
त्याचा वजन व आकार मोजून त्याची वनविभागामध्ये नोंद करून वनरक्षक पंडित मेकेवाड, व वन चौकीदार देवेंद्र उईके यांच्या समक्ष आलेवाही जंगलामध्ये सुरक्षित ठिकाणी सोडून जिवदान दिला. यावेळेस या संस्थेचे सदस्य प्रशांत सहारे , कैलास बोरकर , कृणाल रामटेके, वेदप्रकाश मेश्राम, यश कायरकर, गिरीधर निकूरे हे उपस्थित होते.