नागभीड तालुक्यातील पोक्सो गुन्ह्यातील आरोपीस २० वर्षाची शिक्षा 

नागभीड तालुक्यातील पोक्सो गुन्ह्यातील आरोपीस २० वर्षाची शिक्षा 

पोलीस स्टेशन नागभिड हद्दीतील मौजा कसरला परीसरात दिनांक ०७/०८/२०२० रोजी यातील पिडीतेला आरोपीतांनी संगणमत करून पळवुन नेले व तिचे सोबत बळजबरीने लैंगीक अत्याचार केला. अशा फिर्यादीचे तक्रारीवरून आरोपी नामे १) अजय मुर्लीधर नन्नावरे वय २० वर्ष २) मंगेश दिवाकर मगरे वय २५ वर्ष यांचे विरूध्द दिनांक ०८/०८/२०२० रोजी अपराध कमांक २२७/२०२० कलम ३६३,३७६ (१) (ए),३७६ (डी), ३०५ भादवी सहकलम ५ (ग), ६ लैंगीक गुन्हयापासुन बालकांचे संरक्षण कायदा २०१२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. सदर गुन्हयाचा तपास सपोनी पुनम पाटील यांनी केला असुन आरोपी विरुध्द सबळ साक्षपुरावा उपल्बध करून गुन्हयाचा योग्य तपास करून आरोपी विरुध्द दोषारोपत्र न्यायालयात सादर करण्यात आले. सदर खटला मा. कोर्ट विद्यमान श्रीमती ए.डी.देव मॅडम डी.जे. १ सत्र न्यायालय चंद्रपूर यांचे कोर्टात आरोपी विरूध्द खटला चालु असतांना सबळ साक्षपुरावे मिळुन आल्याने आज दिनांक १६/०३/२०२४ रोजी आरोपी १) अजय मुर्लीथर नन्नावरे वय २० वर्ष २) मंगेश दिवाकर मगरे वय २५ वर्ष यास २० वर्ष कारावास अशी शिक्षा देण्यात आली.

सदर गुन्हयात आरोपीस शिक्षा ठोठावण्यास सरकारतर्फे सहा. सरकारी अभियोक्ता देवेंद्र महाजन तसेच कोर्ट पैरवी अधीकारी म्हणुन सफौ. कुंदन वाघमारे ब.न.६८१ पोरटे नागभिड यांनी मोलाची कामगीरी बजावली.