राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम  लाभार्थी हृदयशस्त्रक्रियेकरीता रवाना

राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम  लाभार्थी हृदयशस्त्रक्रियेकरीता रवाना

           भंडारा,दि.19: जिल्हा रुग्णालय भंडारा येथे राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत ते १८ वयोगटातील अंगणवाडीतील बालकांची व शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत तपासणी पथकामार्फत करण्यात येते.

          आरोग्य तपासणीअंती भंडारा जिल्हयामध्ये एकुण २७४ संशयग्रीत हृदय शस्त्रक्रियेचे लाभार्थी आढळून आलेले आहे. त्यानुषंगाने सदर संशयित हृदयरुग्ण लाभार्थ्यांचे २ डी ईको तपासणी शिबिर २३ फेब्रुवारी व १ मार्च २०२४ ला जिल्हा रुग्णालय भंडारा येथे घेण्यात आले, सदर शिबिरामध्ये १३० संशयित हृदयरुग्ण लाभार्थ्यांचे २ डी ईको काढण्यात आले. त्यामध्ये ६६ हृदयरुग्ण शस्त्रक्रियेकरीता लाभार्थी आढळून आले.

             सदर लाभार्थ्यांमधून आज १८.मार्च,२०२४ ला आचार्य विनोबा भावे ग्रामिण रुग्णालय सावंगी मेघे, जिल्हा वर्धा येथे १७ हृदयरुग्ण लाभार्थी व १ Cleft lip palate असे एकुण १८ लाभार्थ्यांच्या वाहनाला हिरवी झंडी दाखवून दिपचंद सोयाम जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हा रुग्णालय भंडारा यांनी शस्त्रक्रियेकरीता रवाना केले. त्यावेळेस डॉ. अतुलकूमार टेंभूर्ण अति. जिल्हा शल्यचिकित्सक जि.रु. भंडारा, डॉ. अमित चुटे, निवासी वैद्यकीय अधिकारी (बा.सं) जि.रु. भंडारा तसेच सर्व राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम व जिल्हा शिर्थ हस्तक्षेप केंद्र (डीईआयसी) अंतर्गत वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.