४ पोक्सो गुन्हयातील आरोपीस २० वर्ष शिक्षा

अप क. १३७४/२०१८ कलम ३७६ (२) (१), ३६३ (अ) भादवी सहकलम ४ पोक्सो गुन्हयातील आरोपीस २० वर्ष शिक्षेबाबत.

दिनांक १७/१२/२०१८ रोजी पोलीस स्टेशन पोस्टे बल्लारशाह हद्दीतील एका १४ वर्षीय अल्पवयीन पिडीत मुलीवर आरोपीने वारंवार जबरीने लैंगीक अत्याचार केला होता. त्यामुळे ३५ वर्षीय आरोपी विरुध्द दिनांक १७/१२/२०१८ रोजी पोलीस स्टेशन बल्लारशाह येथे अपराध क्रमांक १३७४/२०१८ कलम ३७६(२)(१),३६३(अ) भादवी सहकलम ४ लैंगीक गुन्हयापासुन बालकांचे संरक्षण कायदा २०१२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. सदर गुन्हयाचा तपास पोउपनी प्राची राजुरकर यांनी केला असुन आरोपी विरूध्द सबळ साक्षपुरावा उपल्बध करून गुन्हयाचा योग्य तपास करून आरोपी विरूध्द दोषारोपत्र न्यायालयात सादर करण्यात आले. सदर खटला मा.कोर्ट विद्यमान अनुराग दिक्षीत साहेब सत्र न्यायालय चंद्रपूर यांचे कोर्टात आरोपी विरूध्द खटला चालु असतांना सबळ साक्षपुरावे मिळुन आल्याने आज दिनांक ०६/०३/२०२४ रोजी आरोपी चिन्ना उर्फ रामलाल निषाद वय ३५ वर्ष यास २० वर्ष सश्रम कारावास व ५००० रू. दंड, दंड न भरल्यास १२ महीने कारावास अशी शिक्षा देण्यात आली.

सदर गुन्हयात आरोपीस शिक्षा ठोठावण्यास सरकारतर्फे सहा. सरकारी अभियोक्ता आसिफ शेख तसेच कोर्ट पैरवी अधीकारी म्हणुन महिला पोहवा. अनिता मोहुर्ले ब.न.२६८ पोस्टे बल्लारशाह यांनी मोलाची कामगीरी बजावली.