जि. प. प्राथ. शाळा हेटी येथे माजी विद्यार्थी व बाल आनंद मेळावा संपन्न

जि. प. प्राथ. शाळा हेटी येथे माजी विद्यार्थी व बाल आनंद मेळावा संपन्न 

सींदेवाही ;- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र.2 येथे नुकताच माजी विद्यार्थी तसेच बाल आनंद मेळावा कार्यक्रम नुकताच शाळेच्या मुख्याध्यापिका वर्षा कशप आणि शालेय व्यवस्थापन समिती तसेच विद्यार्थी पालक यांच्या मदतीने घेण्यात आला. सदर कार्यक्रम प्रसंगी समस्त माजी विद्यार्थी तसेच शालेय विद्यार्थी पालक उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन माजी विद्यार्थी तथा जिल्हा परिषद माजी सभापती नागराज गेडाम यांच्या शुभ हस्ते पार पडले. याप्रसंगी समस्त माजी विद्यार्थी उपस्थित होते. समस्त माजी विद्यार्थ्यांनी जुन्या कडू गोड शालेय आठवणींना उजाळा देत आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी आनंद मेळाव्यात विविध फराळाचे प्रदर्शन केले होते. उपस्थित विद्यार्थी पालकांनी सदर आनंद मेळाव्याचा मनसोक्त आस्वाद घेतला. तसेच सदर कार्यक्रमात चिमुकल्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. उपयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक नृत्य सादर केले व स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.सदर कार्यक्रमाचे संचालन माजी विद्यार्थी जितेंद्र बेलोरकर तर आभार अमोल साळवे सर यांनी मानले. याप्रसंगी नगरपंचायत तथा शहराचे प्रथम नागरिक स्वप्नील कावळे, उपाध्यक्ष मयूर सूचक , शिक्षण विस्तार अधिकारी छोटुभाई आवळे, माजी शिक्षक जयंत लेंझे, नगरसेवक किशोर भरडकर, सुनिल उईके, इत्यादी मान्यवर तथा समस्त विद्यार्थी पालक उपस्थित होते.