महानगर महिला मोर्चा तर्फे शक्तीवंदन मॅराथॉन 4 मार्च ते 6 मार्च पर्यंत  आयोजन

महानगर महिला मोर्चा तर्फे शक्तीवंदन मॅराथॉन 4 मार्च ते 6 मार्च पर्यंत  आयोजन
रन फॉर नेशन,रन फॉर मोदी उपक्रममहानगर भारतीय जनता पार्टी अंतर्गत असलेल्या महानगर महिला मोर्चा तर्फे पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात 3 दिवसीय शक्तीवंदन कार्यक्रमाचे आयोजन 4,5 व 6 मार्चला करण्यात आले आहे.मॅराथॉन 2024 या उपक्रमाची सुरवात 4 मार्चला सकाळी 7 वाजता केली जाणार आहे.महानगर जिल्हाध्यक्ष राहुल पावडे व महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सविता कांबळे यांच्या नेतृत्वात हे आयोजन करण्यात येत असून ‘रन फॉर नेशन,रन फॉर मोदी’अशी संकल्पना घेऊन मातृशक्तीला वंदन केले जाणार आहे.

या उपक्रमासाठी वयोगट 14 ते 45 व 45 च्यावर वयाच्या महिला असे 2 गट तयार करण्यात आले आहेत. 4 मार्च 2024 सकाळी 07 वाजता मॅरोथॉनची सुरवात  गांधी चौक येथून होणार असून जटपुरा गेट ते गिरणार चौक व परत  गांधी चौक येथे मॅराथॉन समाप्त होईल.दोन्ही गटातील विजेत्यांना आकर्षक पुरस्कार दिले जाणार असून सर्वांना सहभाग प्रमाणपत्र वितरित केले जाणार आहे.
5 मार्चला मोटार सायकल रॅली
मोटरसायकल रॅलीचे आयोजन 5 मार्चला सायं 4 वाजता करण्यात आले असून शिवाजी चौक ते कोतपल्लीवार पेट्रोल पंप असा प्रवास रॅलीचा असणार आहे.
6 मार्चला पंतप्रधान नरेन्द्र मोदींचे संबोधन

पंतप्रधान नरेंद्र मोदी शक्तीवंदन निमित्य विशेषत्वाने महिलांना संबोधित करणार असून महानगरातील 5 मंडळात याचे थेट प्रक्षेपण बघण्याची व्यवस्था महिला मोर्चा तर्फे करण्यात आली आहे.मॅरॉथॉन व  मोटारसायकल रॅलीसाठी
इच्छुकांनी
महिला मोर्चाच्या शितल गुरनुले (7058074604,) माया उईके (7499671537), स्मिता रेभनकर (9763643703),शिला चव्हान (9881683901) यांचे सोबत संपर्क साधावा असे आवाहन सुषमा नागोसे यांनी केले आहे.