महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिवा पुरस्काराकरिता अर्ज सादर करण्याचे आवाहन

महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिवा पुरस्काराकरिता अर्ज सादर करण्याचे आवाहन

             भंडारा, दि.28 :2016-17 या वर्षीपासून राज्यातील वीरशैव – लिंगायत समाजचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकास होण्यासाठी, समाज प्रबोधन व साहित्यीक क्षेत्रात कार्य करणा-या संस्थांना महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमीत्त प्रतिवर्षी वैशाख शुध्द (अक्षय तृतीया) या दिवशी त्यांच्या नावाने एक व्यक्ती व एका संस्थेला महात्मा बसवेश्वर सामाजिक समाता-शिवा पुरस्कार देणेबाबतच्या योजनेला शासनाने मान्यता दिली आहे.

          त्या अनुषंगाने वीरशैव लिंगायत समाजातील समाज कल्याण, समाज संघटनात्मक, कलात्मक अध्यात्मिक प्रबोधन आणि साहित्यीक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे तथा कल्याणासाठी झटणान्या नामवंत समाजसेवक, कलावंत, समाज संटनात्मक कर्यकर्ते, अध्यात्मिक प्रबोधनकार व साहित्यीक आसवेत सामाजिक क्षेत्रात सामाजसेवकांनी कमीत कमी 10 वर्ष कार्य केलेले असावेत. सामाजिक कार्यकत्यांचे वय पुरुषासाठी 50 वर्ष व त्यापेक्षा जास्त्, तसेच स्त्रीयासाठी 40 वर्ष व त्यापेक्षा जास्त असावे. ह्या पुरस्काराकरीता जात, धर्म, लिंग या बाबतचा विचार केला जाणार नाही.

          या पुरस्काराकरिता आमदार, खासदार, जिल्हा परिषद सभासद किंवा लोकप्रतिनीधी पात्र असणार नाही.

समाज कल्याण क्षेत्रात वीरशैव लिंगायत समाजाच्या उन्नतीसाठी शिक्षण, आरोग्य, आध्यात्मिक विकास करणे, अन्याय निर्मुलन करणे, अंधश्रध्दा रुढी निर्मुलन करणे, सामाजिक न्याय मिळवुन देणे समाजाला आरक्षण व संरक्षण मिळवुन देणे, सामाजिक व संघटनात्मक जनजागरण करणे इत्यादी क्षेत्रात कार्य करणा- या सामाजिक संस्थांना हा पुरस्कार दिला जाईल.

            सदर पुरस्काराकरिता संस्था पब्लीक चॉरिटेबल ट्रस्ट व सोसायटीज रजिस्ट्रेशन अॅक्ट 1960 खाली नोंदणीकृत असावी. संस्थेचे समाज कल्याण क्षेत्रातील सेवा क कार्य 10 वर्षापेक्षा जास्त असावे. स्वयंसेवी संस्था राजकारणापसुन अलिप्त असावी, तसेच तिचे कार्य व सेवा ही पक्षातीत व राजकारणापासुन स्वतंत्र व अलिप्त असावे वीरशैव लिंगायत समाजसेवा आणि समाजाचा विकास या क्षेत्रातील कामाचा विचार करुनच हा पुरस्कार स्वयंसेवी संस्थांना दिला जाईल.

           उपरोक्त प्रमाणे सर्व अटी पुर्ण करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते व सेवाभावी संस्थांना आपले विही प्रपत्रात प्रस्ताव व जातीचे प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, पासपोर्ट आकाराचे रंगीत फोटो तसे समाजसेवा केल्याचे सर्व पुरावे (कागदपत्रे, फोटो, वृत्तपत्र कात्रण इ.) तसेच चारीत्राविषयी पोलीस अधिक्ष किंवा तत्सम अधिकारी यांचे कडुन दाखला प्राप्त करुन अर्ज दि. 15.03.2024 पर्यंत (3) प्रतित) कार्यालयास सादर करावा. अर्ज करणाऱ्या समाजसेवक यांनी अधिक माहितीकरीता तसेच सम पुरस्काराच्या अर्जाच्या नमुन्याकरिता सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण भंडारा या कार्यालयाशी संपर्क साधावे, असे बाबासाहेब देशमुख, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण भंडारा यांनी आवाहन केले आहे.