साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

गडचिरोली, दि.27: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) गडचिरोली मार्फत मातंग समाज व तत्सम १२ पोट जातीतील कुटुंबाची सामाजीक, आर्थीक उन्नती व्हावी त्यांना रोजगार व स्वंरोजगाराची साधणे उपलब्ध व्हावीत या उद्देशाने तसेच सर्वसामान्यांचा विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी महामंळाने नविण्यपुर्ण योजना सुरू केल्या आहेत. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ तळाकाळापर्यंत व शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहचण्याकरीता नाविण्यपुर्ण योजना एनएसफडीसी योजना अंतर्गत सुरू झालेल्या आहे. १) सुविधा कर्ज योजना (प्रकल्प मर्यादा ५,००,०००/-) (उदिष्ट ३० लाभार्थी) २) महिला समृध्दी(प्रकल्प मर्यादा १,४०,०००/-) (उदिष्ट २० लाभार्थी ) ३) शैक्षणिक कर्ज योजना देशाअतंर्गत शिक्षणासाठी ३०.०० लाख, परदेशाअंतर्गत ४०.०० लाख). सदर योजने अंतर्गत प्राप्त होणारे सादर करावा. त्या करीता सर्व लाभार्थीना या वेबसाईटवर https://beta.slasdc/org ONLINE अर्ज करावयाचे आहे. सादर केल्यानंतर त्यांच्या तीन प्रती मुळ कागदपत्रासह कार्यालयास सादर कराव्यात. सदर कर्ज प्रस्ताव स्विकारण्याची अंतीम दिनांक 11 मार्च 2024 आहे. या योजनेस लागणारे कागदपत्रे खालील प्रमाणे असतील १) अर्जदाराचा जातीचा दाखला (सक्षम अधिकारी त्यांचाकडुन घेतलेला असावा.) २) अर्जदाराच्या कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला. ( उत्पन्न मर्यादा 3.00 लाखापर्यंत, तहसीलदार यांच्याकडून घेतलेला असावा.) ३) अ.नुकताच काढलेला पासपोर्ट साईझ फोटोच्या दोन प्रती जोडाव्यात. ४) राशनकार्डच्या झेराक्स प्रती. ५) आधारकार्ड झेराक्स प्रती./ मतदान कार्ड / मोबाईल क्रमांक ( आधारकार्ड लींक ६) अर्जदाराचा शैक्षणिक दाखला. ७) ज्या ठिकाणी व्यवसाय करावयाचा असेल त्या जागेचा उप्लब्धतेबाबतचा पुरावा ८) ज्या ठिकाणी व्यवसाय करावयाचा असेल त्या जागेची भाडे पावती. करारपत्र किंवा मालकी हक्काचा पुरावा. ९) एन.एस.डी.सी.योजनेखाली वाहन खरेदी करण्यासाठी ड्रायविंग लायसन्स व आर.टी.ओ. कडील प्रवासी वाहतुक परवाना इत्यादी १०) वाहन खरेदी साठी वाहनाचे दरपत्रक ११) व्यवसायासंबंधी तांत्रीक प्रमाणपत्र तसेच अनुभवाचा दाखला. १२) व्यवसायासंबधी प्रकल्प अहवाल. १३) खरेदी करावयाच्या मालाचे, साहित्याचे कोटेशन. १४)प्रतिज्ञापत्र ( रू.100 स्टॅम्प पेपरवर, यापुर्वी महामंडळाच्या योजनेचा व अन्य इतर शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा तसेच कर्ज मंजुरी नंतर कर्ज परतफेडीच्या हमी साठी दोन सक्षम जमानतदार देण्यात येईल.) लाभार्थीचे सिवील स्कोर 500 च्या वर असावा. कर्ज मंजुरी नंतर दोन सक्षम जामीनदारांच्या वैधानिक या योजनेचा लाभ लाभार्थीनी घ्यावा. असे दस्ताऐवजांची पुर्तता केल्यावरच कर्ज वाटप करण्यात येईल असे जिल्हा व्यवस्थापक एस.व्ही. राचर्लावार यांनी कळविले आहे.