श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा / महीलांची वेशभूषेत कलश शोभायात्रा

श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा / महीलांची वेशभूषेत कलश शोभायात्रा

सिन्देवाही शहरातील त्रिवेणी नगर ,हनुमान मंदिर येथे श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. त्रिवेणी नगरात महीलांची वेशभूषेत कलश शोभायात्रा दिनांक 11 फेब्रुवारी रविवार सकाळी नगरात काढण्यात आली होती. शहरातील त्रिवेणी नगरात हनुमान मंदिर येथे श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा रविवार ला आयोजित करण्यात आले होते . या कार्यक्रम करीता स्वच्छ परिसरात रांगोळी टाकून सकाळी मंदिरातून रथावर सजावटीने श्री गणेश मूर्तीची शोभायात्रा निघाली होती. ढोल ताश्याच्या गजरात नगरातील मुलींनी /महिलांनी डोक्यावर कलश व वेशभूषा परिधान करून भक्तीमय उत्साहाने सहभाग घेतलेला होता. मंदिरात दुपारी गिरीश जोशी महाराज यांचे विधिवत पूजनाने मंदिरात घट स्थापन, होम हवन पूजन , श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झालेला आहे. त्रिवेणी नगरात भक्तीमय वातावरणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये विधिवत पूजा करून सायंकाळी नागरिकांना मंदिर परिसरात भोजनाचे आयोजन हनुमान मंदिर कमिटी चे वतीने करण्यात आले होते.