सेवानिवृत्त सभासद व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.

भंडारा जिल्हा परिषद व पंचायत समिती कर्मचारी सहकारी पतसंस्थेकडून

सेवानिवृत्त सभासद व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.

            भंडारा, दि.6: भंडारा जिल्हा परिषद व पंचायत समिती कर्मचारी सहकारी पतसंस्थेकडून सेवानिवृत्त सभासद व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ जिल्हा परिषद सभागृह भंडारा येथे 4 फेब्रुवारी रोजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन विभाग) जयप्रकाश परब यांचे प्रमुख उपस्थितीत संस्थेचे अध्यक्ष संदिप फुंडे, उपाध्यक्ष चंद्रमणी मेश्राम तसेच संचालक अंशुमन पंधरे, दिगंबर गभणे, ज्ञानेश्वर दोनोडे, मेघराज हेडाऊ, प्रफुल घरडे, निलेश वरकडे, सुधांशु नेवारे, सोपान शेंद्रे, विजय ठवकर, योगराज धांडे, श्रीमती वनिता सार्वे, सौ.चंदा चारमोडे/झलके कार्यकारी संचालक अनोद साठवणे यांचे उपस्थितीत आयोजीत करण्यात आले.

            सेवानिवृत्त सभासद व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करतांना जयप्रकाश परब, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन विभाग) जिल्हा परिषद भंडारा यांनी सेवानिवृत्तीनंतर मिळणाऱ्या लाभाबाबत जागरुक राहुन, भविष्यात उद्भवणाऱ्या परिस्थितीकरीता आपल्याच संस्थेमध्ये किंवा इतरत्र अधिक लाभ देण्याऱ्या ठिकाणी गुंतवणूक करुन घेऊन सेवानिवृत्तीनंतर सुखकर जिवन उपभोगावे असे मोलाचे मागदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत संस्थेचे अध्यक्ष संदिप फुंडे यांनी व्यक्त केले, तर प्रास्तावीकेत संस्थेचे उपाध्यक्ष चंद्रमणी मेश्राम यांनी सभासदांना सेवानिवृत्तीनंतर मिळणाऱ्या उपदानाची रक्कम संस्थेच्या ठेवीतच गुंतवणून करुन संस्थेच्या प्रगतीत सहाकार्य करावे असे आवाहन केले. भंडारा जिल्हा परिषद व पंचायत समिती कर्मचारी सहकारी पतसंस्थेकडून सेवानिवृत्त सभासदांना  शाल-श्रीफळ, दहा हजार रुपायाचे धनादेश तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, रोख रक्कम व ट्रॉफी देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवविण्यात आले.

            सत्कार समारंभात कार्यक्रमाचे सुरेख सुत्रसंचालन सौ.चंदा चारमोडे/झलके यांनी केले तर आभार प्रदर्शन संचालक दिगंबर गभणे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरीता प्रदिप लांजेवार, सुधाकर चोपकर, मोहन तेलमासरे, मनोज देशमुख, विनोद राठोड, हरिदास पडोळे, हर्षल गायधने यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तर कार्यक्रमाच्या व्यवस्थेकरीता संजय सेलाकर, अनिल सपाटे, उमेश पराते, विनोद टिचकुले, स्वप्नील लाडे, कुसुम चामट, शारदा सोयाम, विकास मने, पोर्णीमा गायधनी यांनी परिश्रम घेतले.