विद्या प्रसारक संस्था द्वारा वार्षिक उत्सव संपन्न

विद्या प्रसारक संस्था द्वारा वार्षिक उत्सव संपन्न

विद्या प्रसारक संस्था सिंदेवाही आणि सर्वोदय विद्यालय, सर्वोदय कन्या विद्यालय, सर्वोदय महाविद्यालय व सर्वोदय विद्यालय गडबोरी तर्फे दिनांक 24 जानेवारी ते 27 जानेवारी दरम्यान वार्षिक उत्सव समारंभ अंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रम, सेवानिवृत्त कर्मचारी व गुणवंत विद्यार्थी सत्कार तथा पंडित दीनदयाल सभागृहाचे लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
24 जानेवारीला वार्षिक उत्सव उद्घाटनाच्या दिवशी सेवानिवृत्त कर्मचारी व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार प्रा. डॉ. योगेश दूधपचारे यांच्या उपस्थितीत पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष योगेंद्रजी जयस्वाल हे होते. यावेळी संस्थेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. याशिवाय गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. यावेळी संस्थेचे सचिव अरविंद जयस्वाल, सहसचिव मनोहर नन्नेवार, सदस्य सुदामराव खोब्रागडे उपस्थित होते. प्रस्ताविक संस्थेचे सचिव अरविंद जयस्वाल यांनी केले. आभार प्रदर्शन प्राचार्य अतुल केकरे तर संचालन प्रा. नितीन खोब्रागडे यांनी केले.
25 जानेवारीला सर्वोदय कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय च्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान योगेंद्र जयस्वाल यांनी भूषवले. यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. सांस्कृतिक कार्यक्रमात सुमारे 156 विद्यार्थीनी कलागुण सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य संगीता यादव यांनी तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक विलास धुळेवार यांनी केले.
26 जानेवारीला सर्वोदय विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय च्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम व नगरपंचायत सदस्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जोगेंद्र जयस्वाल यांनी भूषविले. संस्थेचे अध्यक्ष योगेंद्र जयस्वाल व सचिव अरविंद जयस्वाल व संस्थेचे पदाधिकारी यांच्या हस्ते नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सर्वोदय विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय च्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य अतुल केकरे तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक सुनील सुकारे यांनी केले.
27 जानेवारीला पंडित दीनदयाल सभागृहाचे लोकार्पण सोहळा माजी आमदार अतुल देशकर यांच्या हस्ते पार पडले. सर्वोदय महाविद्यालय व सर्वोदय विद्यालय गडबोरी तर्फे आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान योगेंद्रजी जयस्वाल यांनी भूषवले. यावेळी शाळा व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात विविध प्रकारचे कला गुण सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. राजेश डहारे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. नागलवाडे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता विद्या प्रसारक संस्थेचे सचिव व संयोजक अरविंद जयस्वाल, प्राचार्य राजेश डहारे, प्राचार्य अतुल केंकरे, प्राचार्य संगीता यादव, मुख्याध्यापक नंदनवार, विद्याप्रसाद संस्थेचे सर्व पदाधिकारी, शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.