राष्ट्रीय आरोग्य अभियानातर्फे सिकलसेल आजार नियंत्रणाचे आयोजन

राष्ट्रीय आरोग्य अभियानातर्फे सिकलसेल आजार नियंत्रणाचे आयोजन

गडचिरोली, दि.12: राष्ट्रीय आरोग्य अभियानातर्फे सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत दिनांक 11 डिसेंबर ते 17 डिसेंबर 2022 रोजी सिकलसेल सप्ताह” या कार्यक्रमाचा उदघाटन सोहळा नवजिवन पब्लिक स्कुल, नवेगाव गडचिरोली येथे जिल्हा आरोग्य विभाग जि.प.गडचिरोली व सामान्य रुग्णालयच्यावतीने नवजिवन पब्लिक स्कुल, नवेगाव यांच्या सहकार्याने घेण्यात आलले आहे.

दिनांक 11 डिसेंबर ते 17 डिसेंबर 2022 रोजी “सिकलसेल सप्ताह” या कार्यक्रमाचा उदघाटन कार्यक्रमाच्या निमित्त रॅली व सिकलसेल आरोग्य तपासणीचे उदघाटन डॉ.दावल साळवे जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परीषद, गडचिरोली व डॉ. अनिल रुडे, जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने हिरवी झेंडी दाखवून सकाळी ९.०० वाजता नवजिवन पब्लिक स्कुल, नवेगाव गडचिरोली येथून रॅली काढण्यात आली. सदर रॅलीचे समारोप व सिकलसेल रुग्णाचे तपासणी शिबीराचे आयोजन नवजिवन पब्लिक स्कुल, नवेगाव, गडचिरोली येथे करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे क्रमाचे उद्घाटन डॉ. दावल साळवे जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परीषद, गडचिरोली व डॉ.अनिल रुडे, जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला. तसेच शाळेतील इय्यता 5 वी ते 10 वी पर्यंत विद्यार्थ्यांची सिकलसेल तपासणी करण्यात आली.

डॉ. दावल साळवे जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली, यांनी सर्वानी सिकलसेल तपासणी करुन घ्यावी असे आवाहन उपस्थित सर्व विद्यार्थी व शिक्षक वृंद

यांना केले. डॉ.अनिल रुढे जिल्हा शल्य चिकित्सक, सा.रु.गडचिरोली, यांनी विवाह पूर्वी सिकलसेल तपासणी करण्यात यावी तसेच प्रसुतीपुर्व गर्भजल तपासणी करुन सिकलसेल आजारास नियंत्रण करता येईल या करीता समाजामध्ये सिकलसेल आजाराबाबत जनजागृती जास्तीत जास्त प्रमाणात करणे आवश्यक आहे. तसेच विवाहपुर्व आरोग्य तपासणीची कुंडली तयार करुन विवाह करण्यात यावा, असा संदेश देण्यात आलेला आहे. सदर कार्यक्रमाला डॉ. अजय कार्सलावार, वैद्यकिय अधिकारी, प्रा.आ.केंद्र पोर्ला व डॉ. मनोहर मडावी, वैद्यकिय अधिकारी, प्रा.आ.पथक पार्डी सदर कार्यक्रमाला कार्यक्रमाला उपस्थित होते. सदर कार्यक्रमामध्ये सिकलसेल रुग्णांची नोंद करुन सिकलसेल तपासणी करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालक श्रीमती शितल गोरकार शिक्षीका नवजिवन पब्लिक स्कुल, नवेगाव यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार विकास गोरडवार मुख्यध्यापक नवजिवन पब्लिक स्कुल, नवेगाव यांनी मानले. तसेच राजेश जाधव, आरोग्य सेवक, नवेगाव उपकेंद्र. श्रीमती नीता बालपांडे, स्वपनील चापले, नवेगाव उपकेंद्र अंर्तगत आशा स्वयंसेवीका,

आरोग्य सेविका व इतर कर्मचारी सदर कार्यक्रमाला उपस्थित राहून सहकार्य केले.