15 जानेवारी रोजी मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्त यांची गडचिरोली जिल्ह्याला भेट

15 जानेवारी रोजी मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्त यांची गडचिरोली जिल्ह्याला भेट

गडचिरोली, दि.10 :दिनांक 01 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरु असून विभागीय आयुक्त, नागपूर विभाग, नागपूर, श्रीमती विजयलक्ष्मी बिदरी, यांना मतदार यादी निरीक्षक (Electoral Roll Observer) म्हणून नियुक्त केले आहे.
भारत निवडणूक आयोग यांचेकडून प्राप्त सुचनेनूसार दिनांक 01 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचे विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाच्या संपुर्ण कालावधीत मतदार यादी निरीक्षक यांना जिल्हा निहाय एकुण तिन भेटी द्यावयाच्या आहेत. त्यामध्ये मतदार यादी प्रसिद्ध करण्याच्या कालावधीत तिसरी भेट (Third Visit) द्यावयाची आहे.
त्याअनुषंगाने मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्त नागपूर विभाग, नागपूर, श्रीमती विजयलक्ष्मी बिदरी हे दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी गडचिरोली जिल्ह्यात तिसरी भेट देणार आहेत. सदरचे भेटी दरम्यान उक्त विषयाबाबत मतदार नोंदणी अधिकारी यांची दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी दुपारी 4.30 वाजता सभा घेणार आहेत. असे उप जिल्हा निवडणूक अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.