दूरदृष्टी, लगन, चिकाटी, जिद्द, सहनशीलता हे गुण अंगीकारले पाहिजे -खासदार अशोक नेते

दूरदृष्टी, लगन, चिकाटी, जिद्द, सहनशीलता हे गुण अंगीकारले पाहिजे -खासदार अशोक नेते

कृष्णा सहयोगी तंत्र शिक्षण संस्था देवरी.द्वारा संचालित, छत्रपती शिवाजी संकुल येथे शिव तरंंग वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन.

विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी कृष्णा सहयोगी तंत्र शिक्षण संस्था देवरी द्वारा संचालित छत्रपती शिवाजी संकुल या संस्थेच्या वतीने रौप्य महोत्सवी कार्यक्रमा निमित्त ” शिवतरंंग ” वार्षिक स्नेहसंमेलन दि.०२ जानेवारी ते ०७ जानेवारी २०२४ पर्यंत सांस्कृतिक, बौद्धिक, कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या शिवतरंंग वार्षिक स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमाला खासदार अशोक नेते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना
विद्यार्थ्यांनी जीवनामध्ये जगत असतांना दूरदृष्टी, लगन, चिकाटी, जिद्द, सहनशीलता गुण अंगीकारले पाहिजे व आत्मसात केले पाहिजे.विद्यार्थ्यांनी दूरदृष्टीने अभ्यास केला पाहिजे.कोणतेही कार्य करतांना जिद्दीने,चिकाटीने, आत्मविश्वास ठेऊन कार्य केले पाहिजे.कुठलाही वाद-विवाद न करता शांत चित्ताने पार पाडावे व सहनशीलता जोपासावी.
विद्यार्थ्यांना कला, कौशल्ये, विकसित व्हावा, त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा. यासाठी दरवर्षी छत्रपती शिवाजी संकुल संस्थेच्या वतीने चांगले कार्यक्रम आयोजित केले जाते. या संस्थेला माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत तसेच सर्वांना सुद्धा नववर्षाच्या शुभेच्छा असे विद्यार्थ्यांना सुचक उदबोधनात्मक मार्गदर्शन खासदार अशोक नेते यांनी या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय स्थानावरून बोलतांना प्रतिपादन केले.

वार्षिक स्नेह संमेलन या कार्यक्रमा निमित्ताने चित्रकला प्रदर्शनी, विज्ञान प्रदर्शनी तसेच हस्तकला प्रदर्शनी,दिनदर्शिकांचे प्रकाशन याचा सुद्धा या ठिकाणी आयोजन केलं होतं.

यावेळी छ. शिवाजी महाराजांची प्रतिमा, नृत्य, फुलांचा वर्षाव, बँड वाद्यासह स्वागत गीताने पाहुण्यांचा स्वागत केले हे विशेष प्रतिमा या ठिकाणी पाहायला मिळाली.

याप्रसंगी प्रामुख्याने मंचावर या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे‌ अशोक नेते,मुख्य कार्य. अधि.जिल्हा परि.गोंदियाचे अनिल पाटील,शिक्षणाधिकारी कादर शेख,उपविभागीय अधिकारी सत्यम गांधी, शिक्षणाधिकारी महेंद्र गजभिये, छ.शिवाजी संकुल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा भाजपाचे जेष्ठ नेते झामसिंग जी येरणे,प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार,देवरी नगर परिषदेचे नगराध्यक्ष संजय ऊईके,महिला बालकल्याण सभापती सविताताई पुराम, गटशिक्षणाधिकारी महेंद्र मोटघरे,संचालक कृ.उ. बा. समितीचे यादवराव पंचमवार, छ.शि.सं.सचिव तथा जिल्हा महामंत्री अनिल येरणे,भाजपा जेष्ठ नेते दिपक शर्मा, कृष्णा ताई येरणे,डॉ. सुनील येरणे,मनोज भुरे, गुणवंत काशीवार,तसेच छत्रपती शिवाजी कॉन्व्हेंट,
छत्रपती शिवाजी प्राथमिक विद्यामंदिर, छत्रपती शिवाजी हायस्कूल तथा कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, देवरी. विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.