‘राष्ट्रीय ग्राहक दिन’ मार्गदर्शनपर कार्यक्रमाने साजरा

राष्ट्रीय ग्राहक दिन’ मार्गदर्शनपर कार्यक्रमाने साजरा

चंद्रपूर दि.29 : ‘राष्ट्रीय ग्राहक दिन’ निमित्त  ग्राहकांचे हक्क, ग्राहक कायद्याचा वापर व ई-कॉमर्स व्यवहारातील दक्षता याबाबत जिल्हा प्रशासनाद्वारे विशेष मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे नुकतेच तहसिल कार्यालय येथे  आयोजन करून  राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाला, ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष परशुराम तुंडुलवार, अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष नंदिनी चुनारकार, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी पांडुरंग माचेवाड, खरेदी अधिकारी हेमंत गांगुर्डे, सहायक लेखा अधिकारी प्रमोद बोरसरे, आशिष मिश्रा, आनंद मेहेरकुरे आदींची उपस्थिती होती.

याप्रसंगी परशुराम तुंडुलवार यांनी ग्राहक चळवळीचा इतिहास व ग्राहक हक्कांच्या संवर्धनासाठी असलेली व्यवस्था याबाबत तर नंदिनी चुनारकार यांनी ई-कॉमर्स आणि डिजिटल व्यापाराच्या युगात ग्राहक संरक्षण या विषयावर मार्गदर्शन केले. ग्राहकांचे अधिकार व ग्राहकांनी बाळगावयाच्या दक्षतेबाबत पांडुरंग माचेवाड यांनी तर हेमंत गांगुर्डे यांनी ग्राहक कायदे व त्यांचा ग्राहक संरक्षणासाठी वापर याबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नायब तहसिलदार राजू धांडे यांनी केले. संचालन पुरवठा निरीक्षक खुशबु चौधरी, यांनी तर सुषमा उरकुडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला विजय पवार, मंजुषा काकडे, ग्राहक संघटनांचे पदाधिकारी सदस्य, तहसिल कार्यालय व अन्न व नागरी पुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.