उच्च शिक्षणासाठी 30 लाखांपर्यत कर्ज

उच्च शिक्षणासाठी 30 लाखांपर्यत कर्ज

अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या शैक्षणिक कर्ज योजनेचा लाभ घ्या

       भंडारा, दि. 28  : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मार्फत मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज योजनेअंतर्गत उच्च शिक्षणासाठी 30 लाख रुपये तर विदेशात शिक्षण घेण्यासाठी 40 लाख रुपये इतके शैक्षणिक कर्ज उपलब्ध करुन देण्यात येतात.या शैक्षणिक कर्ज योजनेचा विद्यार्थी व पालकांनी लाभ घेण्याचे आवाहन महामंडळाच्यावतीनेक करण्यात आले आहे.          तसेच एनएसएफडीसी दिल्ली महामंडळामार्फत येत असलेल्या शैक्षणिक कर्ज योजना सन 2023-24 पूर्ववत सुरु झाली आहे.या शैक्षणिक कर्ज योजनेसाठी देशांतर्गत शिक्षणासाठी 30 लाख रुपये व परदेशांतर्गत शिक्षणासाठी 40 लाख रुपये कर्जाची मर्यादा आहे. महामंडळाने शीफारस केलेल्या अर्जानुसार लाभार्थी निहाय निघी एन.एस.एफ.डी. सी.कडून उपलब्ध करुन देण्यात येतो.देशांतर्गत व परदेशांतर्गत शिक्षणासाठी 3 लाख रुपये उत्पन्न मर्यादा आहे.

        शैक्षणिक कर्ज व्याज दर परतफेड  

         देशातंर्गत शैक्षणिक कर्जासाठी व्याज दर महिला लाभार्थी साठी 5.5 टक्के व पुरुष लाभार्थीसाठी 6 टक्के व्याज दर आहे.विदेशात शिक्षण घेण्यासाठी महिला लाभार्थीसाठी 6.5 टक्के व पुरुष लाभार्थीसाठी 7 टक्के व्याज दर आहे.10 लाख रुपयापर्यतचे कर्ज परत फेडीचा कालावधी 10 वर्षाचा व 10 लाख रुपयापेक्षा जास्तीचे कर्ज परत फेडीचा कालावधीचा 12 वर्षाचा असेल कर्ज परत फेडीचा सुरुवात शिक्षण पुर्ण होऊन 6 महिण्यानंतर किंवा नौकरी लागल्यानंतर यापैकी जे आगोदर होईल तेव्हापासून सुरुवात होईल.

        कर्ज योजना लागू असलेले अभ्यासक्रम

      अभियांत्रिकी.डिप्लोमा.बी.टेक.बी.ई.एम.टेक.आर्किटेक्चर.बी.आर्किटेक्चर,एम.आर्किटेक्चर.मेडीकल मेडीकल एम. बी. बी. एस. एम. डी. एम. एस. बायोटेक्नॉलॉजी. मायक्रोलॉजी क्लीनीकल डिप्लोमा.डिग्री.फार्मसी एम.फार्मसी. बी.फार्मसी ,एम.फार्मसी, डेन्टल  बी.डी.एएस.एम.डी.एस.फिजिओ थेरपी  बी.एस.सी. एम.एस.सी. पॅथोलॉजी बी.एस.सी.एस.एस.सी.नर्सीग बी.एस.सी.एम.एस.सी. माहिती तंत्रज्ञान बी.सी.ए.एम.सी.ए. व्यवस्थापन बी.बी.ए.एम.सी.ए. व्यवस्थापन बी.बी.ए.एम.बी.ए.हॉटेल व्यवस्थापन व कॅटरीन तंत्रज्ञान डिप्लोमा.पदवी पदवीत्युर.विधी एल.एल.बी.एल.एल.एम.शिक्षण सी.टी.एन.टी.टी.बी.एङएम.एङशारिरीक शिक्षण पत्रकारिता अभ्यासक्रमासाठी ही कर्ज सुविधा उपलब्ध आहे.

            अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे

जातीचा दाखला,उत्पन्नाचा दाखला,शैक्षणिक दाखले,ज्या कॉलेज किंवा विद्यापीठात शिक्षण घेत आहात त्या बाबतचा पुरावा,बोनाफाईट,सर्टिफिकेट,कॉलेज किंवा विद्यापीठाची वर्षनिहाय शुल्क बाबत पुरावा,तसेच आधार कार्ड,पासपोर्ट साईज फोटो व इत्यादी घेऊन जिल्हा व्यवस्थापक लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या,भंडारा कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन व्यवस्थापक चक्रवर्ती उके यांनी केले आहे.