काँग्रेसच्या स्त्री पुरुष समानतेच्या धोरणामुळे महिला उच्च पदावर जाऊ शकल्या – डॉ. नामदेव किरसान

काँग्रेसच्या स्त्री पुरुष समानतेच्या धोरणामुळे महिला उच्च पदावर जाऊ शकल्या – डॉ. नामदेव किरसान

ग्राम अंतरगाव (निफ.) ता.सावली जि.चंद्रपूर येथे नव शक्ती नाट्य कला मंडळ अंतरगाव यांच्या वतीने “निजला का राजहंस माझा” या नाट्यप्रयोगाच्या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महसचिव तथा गडचिरोली-चिमूर लोकसभा समन्व्यक डॉ. नामदेव किरसान यांनी आपल्या उद्घाटिय भाषणात मनुस्मृति दहन दिवसाचे महत्त्व पटवून देताना सांगितले की, मनुस्मृतीनुसार स्त्रियांना व शूद्रांना वेदाचे वाचन पठण किंवा श्रवण करण्याचा अधिकार नव्हता. सर्वप्रथम महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी मुलींची शाळा सुरू केली. त्याला सनातन्यांनी व धर्मर्तंडांनी कडाडून विरोध केला. परंतु कोणत्याही विरोधाला न जुमानता त्यांनी आपले कार्य सतत सुरू ठेवले. देश स्वतंत्र झाल्यानंतर भारतीय संविधानात स्त्री पुरुष समानता व समतेची तरतूद करण्यात आली. काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरण स्त्री पुरुष समानतेचे असल्याने स्त्रियांना पुढे जाण्याची संधी मिळाली व आज सर्वच क्षेत्रात महिलांना प्रतिनिधित्व मिळत आहे असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती सावली निखिलभाऊ सुरमवार, माझी बांधकाम सभापती दिनेश पा. चिटनुरवार, काँग्रेस कार्यकर्ता संकेतभाऊ बल्लमवार, जितुभाऊ धात्रक, अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी सावली नरसिंगभाऊ गणवीर, जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष गडचिरोली रजनीकांत मोटघरे,  संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती सावली खुशालभाऊ लोडे, काँग्रेस कार्यकर्ता नितीनभाऊ संगीडवार,  श्रीकांत संगीडवार, सुभाष ठाकूर, राजूभाऊ भोयर, केशवजी भरडकर, उपसरपंच सौ सुषमाताई ठाकरे, सौ रेखाताई भोयर, पंकज कागदेलवार, सरपंच भक्तदास भोयर, वैभव गुंज्जनवार, चंद्रशेखर नंदनवार, ईश्वर गडाटे, प्रशांत मलोडे, सदाशिव मलोडे, अशोक बारापात्रे, अशोक नंदनवार, भोजराज धारणे, गणमान्य मंडळी व मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते.