महानगरपालिकेवरील बोजा कोण सहन करेल ? मुदतीत काम पूर्ण न केलेल्या कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करावे

वाल्हेकरवाडी येथील पुणे महानगर विकास प्राधिकरणाकडून प्रकल्पातील जबाबदार अधिकाऱ्यास जबाबदार धरून कारवाई करणार का?

महानगरपालिकेवरील बोजा कोण सहन करेल ?

मुदतीत काम पूर्ण न केलेल्या कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करावे

विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल

नागपूर, १९

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण गृहप्रकल्पाचे काम मूळ मुदतीत पूर्ण न केलेल्या कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करावे तसेच सबंधित कंत्राटदाराला काळया यादीत टाकण्याची आवश्यकता आहे असे सांगत प्रकल्पवाढीस कारणीभूत असलेल्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करणार का असा सवाल विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

वाल्हेकरवाडी येथे पुणे महानगर विकास प्राधिकरणाकडून बांधण्यात येणाऱ्या गृहप्रकल्पात झालेली अनियमितता या विषयावरील तारांकीत प्रश्नाच्या चर्चेवेळी श्री. वडेट्टीवार बोलत होते.

वडेट्टीवार म्हणाले, पुणे विकास प्राधिकरण प्रकल्प हा २०१९ मध्ये पूर्ण व्हायला पाहिजे होता. कारण त्याची मुदत ४२ महिने होती. जवळपास ४६ महिने या प्रकल्पाला विलंब झाला. पहिले ४२ महिने नंतर ४६ महिने विलंब झाला त्यामुळे त्यासाठी आकारण्यात येणाऱ्या दंडात सूट दिली. वर्ष २०२३ मध्ये हा प्रकल्प पूर्ण झालेला नाही. त्या मुदतीत कुठलाही कोविड नव्हता २०१९ मध्ये सदर प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित होते. २०१६ ला या प्रकल्पाला मंजुरी मिळाली ७२ कोटीचा प्रकल्प आता २०० कोटींवर जाईल हा महानगरपालिकेवरील बोजा कोण सहन करेल असा सवाल श्री. वडेट्टीवार यांनी उपस्थित केला