पोलीस पाटील, संगणक चालकांच्या मागण्या मान्य करा

पोलीस पाटील, संगणक चालकांच्या मागण्या मान्य करा

विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मागणी

नागपूर,14:- नागपूर अधिवेशनात अनेक मोर्चे येतात. सध्या २७ हजार ग्रामपंचायत संगणक चालक आले आहेत. त्यांची लहान मुलं आली आहेत. पोलीस पाटलांचा मोर्चा आहे. परंतु सरकारचे कोणीही प्रतिनिधी गेले नाहीत. या मोर्चातील प्रतिनिधींशी चर्चा करून सरकारने त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली.

नागपूर येथे संगणक चालक, पोलीस पाटील यांचा आलेला मोर्चा व मागण्याबद्दल माहिती देताना विधानसभेत श्री. वडेट्टीवार बोलत होते.

श्री. वडेट्टीवार म्हणाले, सरकारने मोर्चाच्या प्रतिनिधींशी चर्चा केली पाहिजे. ते सोलापूरहून आले आहेत. इतक्या थंडीत पोरांना घेऊन बसले आहेत. पोलिस पाटलांचा मोर्चा निघाला आहे. त्यांनी भेटायला वेळ मागितली आहे. त्यांच्या मानधनात, निवृत्ती वेतनात वाढ व्हावी, अशी त्यांची मागणी आहे. सरकारने त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी श्री. वडेट्टीवार यांनी केली आहे.