राज्य वन विभागांने लेखापाल गट–क पदांचा सुधारीत निकाल जाहीर करावा

राज्य वन विभागांने लेखापाल गट–क पदांचा सुधारीत निकाल जाहीर करावा

राज्य वन विभागांच्या वतीने ऑनलाईन स्वरुपात घेण्यात आलेल्या लेखापाल गट-क पदांच्या परीक्षेच्या निकालावर उमेदवारांचे आक्षेप आहेत. लेखापालाची परीक्षा विविध सत्रात घेण्यात आल्याने नियमानुसार काठीण्य पातळी विचारात घेउुन विविध सत्रांमधील गुण समायोजीत करुन समतुल्य निकाल जाहिर करणे अपेक्षित होते. मात्र, सरसकट निकाल जाहिर झाल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे विभागांनी सुधारीत निकाल जाहिर करावा अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. याबाबत शासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी श्री. वडेट्टीवार यांनी केली.