केंद्रीय रस्ते वाहतूक व राजमार्ग मंत्री नितीन गडकरी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

केंद्रीय रस्ते वाहतूक व राजमार्ग मंत्री नितीन गडकरी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

चंद्रपूर, दि. 07: केंद्रीय रस्ते वाहतूक व राजमार्ग मंत्री नितीन गडकरी (आज दि. 8 डिसेंबर) चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर  असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे;

शुक्रवार, दि. 8 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 9.30 वाजता नागपूर येथून वरोराकडे प्रयाण करतील. सकाळी 11 वाजता वरोरा येथे आगमन व क्रीडा संकुल, वरोरा येथे  विदर्भ प्रादेशिक शेतकरी परिषद व कृषी प्रदर्शनास उपस्थित राहतील.

दुपारी 12.30 वाजता चंद्रपूर विभागातील आणि आसपासच्या एनएच (NH) प्रकल्पाचा आढावा. दुपारी 1.00 वाजता नागपूरकडे प्रयाण.