बालकाच्या पालकांनी सात दिवसाच्या आत हक्क दाखवावा Ø अन्यथा दत्तक मुक्त घोषित करणार

बालकाच्या पालकांनी सात दिवसाच्या आत हक्क दाखवावा Ø अन्यथा दत्तक मुक्त घोषित करणार

चंद्रपूर, दि. 01 : महिला विकास मंडळ द्वारा संचालित किलबिल प्राथमिक बालगृह दत्तक संस्था, चंद्रपूर येथील आदित्य नावाच्या बालकाला दत्तकमुक्त घोषित करण्यात येणार असून त्याच्या संबंधित  पालकांनी  सात  दिवसांच्या आत बालकाबाबत आपला हक्क दाखविण्याचे आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर यांनी केले आहे.

राजुरा येथे वर्धा नदी पुलीया रोड येथे कर्तव्यावर हजर असणारे होमगार्ड कर्मचारी यांना वर्धा नदीपुलाजवळ रोडच्या उजव्या बाजुला एक वर्षाचे लहान बालक आढळून आले. सदर बालकाच्या अंगात लाल रंगाचा हाफ टी-शर्ट व कमरेला पांढरा रुमाल गुंडाळलेला होता. राजुरा पोलीस स्टेशनमार्फत सदर बालकास संगोपनाकरीता महिला विकास मंडळद्वारा संचालित, किलबिल प्राथमिक बालगृह दत्तक संस्था येथे दाखल केले. संस्थेने त्या बालकाचे नाव आदित्य असे नोंदवून त्या बालकाला महिला विकास मंडळ द्वारा संचालित, किलबिल प्राथमिक बालगृह दत्तक योजना, चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले.

संबंधित बालकाच्या पालकांनी सात दिवसाच्या आत बालकल्याण समिती, शासकीय मुलाचे निरीक्षण गृह/ बालगृह,डॉ.राजेंद्र आल्लूरवार बिल्डिंग शास्त्रीनगर किंवा जिल्हा बाल संरक्षण कक्षद्वारा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, जुना कलेक्टर बंगला जिल्हा स्टेडियमजवळ अथवा महिला विकास मंडळद्वारा संचालित किलबिल प्राथमिक बालगृह-दत्तक योजना डॉ. मुठाळ यांच्या जुन्या दवाखान्याजवळ रामनगर, चंद्रपूर या पत्त्यावर संपर्क साधावा. व सदर बालकाबाबत आपला हक्क दाखवावा. अन्यथा बाल कल्याण समिती त्या बालकास दत्तक मुक्त घोषित करेल आणि महिला विकास मंडळद्वारा किलबिल संस्था दत्तक देण्याच्या प्रक्रियेची सुरुवात करेल. याची नोंद संबंधित पालकांनी घ्यावी, असे जिल्हा बाल संरक्षण कक्ष चंद्रपूरद्वारे कळविण्यात आले आहे.