मातंग समाजातील शेतजमीन धारकांनी कागदपत्रासह अर्ज सादर करा

मातंग समाजातील शेतजमीन धारकांनी कागदपत्रासह अर्ज सादर करा

भंडारा,दि. 01 : जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या मातंग समाज तत्सम 12  पोटजातीतील ज्या लोकांच्या नावे शेतजमीन आहे त्यांनी कार्यालयीन वेळेत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) जिल्हा कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, भंडारा  या ठिकाणी शेतीचा सातबारा, जातीचा दाखला, आधारकार्ड, पासपोर्ट साईज फोटोसह अर्ज सादर करण्याचे असे आवाहन महामंडळातर्फे करण्यात आले आहे.