ओबीसी महामंडळाच्या एकरक्कमी व्याज परतावा योजनेस मुदतवाढ

ओबीसी महामंडळाच्या एकरक्कमी व्याज परतावा योजनेस मुदतवाढ

चंद्रपूर, दि. 13 : ओबीसी महामंडळाच्या थकीत कर्ज प्रकरणात संपूर्ण थकीत कर्ज रक्कमेचा एकरक्कमी भरणा करणाऱ्या लाभार्थीस थकीत व्याज रकमेत 50 टक्के सवलत देण्याबाबतची एकरक्कमी परतावा योजना दि. 31 मार्च 2024 पर्यंत राबविण्यास संचालक मंडळाने मान्यता दिली आहे. त्यानुसार, महामंडळाच्या थकबाकीदार लाभार्थींनी सदर योजनेचा लाभ घेवून कर्जमुक्त व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक किशोर सातपुते यांनी केले आहे.