‘०३ अपहृत अल्पवयीन मुलींचा शोध घेतला’ स्थानिक गुन्हे शाखा, येथील अनैतीक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाची भरीव कामगीरी

‘०३ अपहृत अल्पवयीन मुलींचा शोध घेतला’ स्थानिक गुन्हे शाखा, येथील अनैतीक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाची भरीव कामगीरी

अल्पवयीन बालकांच्या अपहरणासंबंधाने तातडीने गुन्हे दाखल करण्याचे शासनाच्या विधी विभागाचे आदेश आहेत. तसेच अल्पवयीन बालकांच्या अपहरणासंबंधाने शासनाने निश्चीत धोरण तयार करून अपहृत बालकांचा शोध घेण्याच्या सुचना शासनस्तरावरून निर्गमीत केल्या आहेत व त्याच अनुषंगाने अल्पवयीन बालकांची तस्करी रोखण्याकरीता प्रत्येक जिल्हयात अनैतीक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष स्थापित करण्यात आले आहेत. भंडारा जिल्हयातही अनैतीक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष स्थापन करण्यात आले असुन त्याचे प्रभारी अधिकारी म्हणुन पोलीस निरीक्षक श्री. नितीन चिंचोळकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

पोलीस स्टेशन भंडारा अप. क. ३५३/२०२१ कलम ३६३, ३७०, भा.दं.वि. गुन्हयातील अपहृत पिडीता वय १७ वर्ष हिला दिनांक ०२/१०/२०२१ रोजी अज्ञात आरोपीने फुस लावुन पळवून नेले होते. त्यावरून पो.स्टे. भंडारा येथे गुन्हा नोंद करून त्याचा तपास अनैतीक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाकडे वर्ग करण्यात आला होता. सदर गुन्हयातील अपहृत पिडीत मुलीचा अनैतीक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षातील अधिकारी, अंमलदार यांनी अत्यंत बारकाईने व कशोशीने प्रयत्न करुन तब्बल ०२ वर्षानंतर अपहृत मुलीचा राजस्थान राज्यातून शोध घेण्यात पोलीसांना यश आले आहे.

भंडारा जिल्हयातील स्थानिक गुन्हे शाखेअंर्तगत कार्यान्वीत असलेल्या अनैतीक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाकडे जिल्हयातील अल्पवयीन बालकांच्या अपहरणासंबंधीचे गुन्हे तपासाकरीता येत असतात. पोलीस स्टेशन भंडारा अप. क. ५७१ / २०२२ कलम ३६३, ३७० भा. दं. वि. गुन्हयातील अपहृत पिडीता वय १७ वर्ष हिला दिनांक २५/१०/२०२२ रोजी अज्ञात आरोपीने फुस लावुन पळवून नेले होते त्यावरून पो.स्टे. भंडारा येथे गुन्हा नोंद करून त्याचा तपास अनैतीक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाकडे वर्ग करण्यात आला होता. सदर गुन्हयातील अपहृत पिडीत मुलीचा तपासादरम्यान शोध घेवून तीला दिनांक २१/०९/२०२३ रोजी साकोली परिसरातून शोध घेण्यात पोलीसांना यश आले आहे.

पोलीस स्टेशन पवनी अप.क्र. ३० / २०२३ कलम ३६३, ३७० भा.दं.वि. गुन्हयातील अपहृत पिडीता वय १४ वर्ष हिला दिनांक २९/०१/२०२३ रोजी आरोपीने फुस लावुन पळवून नेले होते त्यावरून पोस्टे. पवनी येथे गुन्हा नोंद करुन त्याचा तपास अनैतीक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाकडे वर्ग करण्यात आला होता. सदर गुन्हयातील अपहृत पिडीत मुलीचा अनैतीक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षातील अधिकारी, अंमलदार यांनी अत्यंत बारकाईने व कशोशीने शोध घेवून तीला दिनांक २४/०९/२०२३ रोजी पारडी, नागपुर येथून शोध घेण्यात पोलीसांना यश आले आहे..

स्थानिक गुन्हे शाखा, भंडारा अंतर्गत कार्यान्वीत असलेल्या अनैतीक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षातील पोलीस अधिकारी, अंमलदार यांनी मागील ०३ आठवडयात ०३ अपहृत पिडीतांचा वेगवेगळ्या ठिकाणाहून शोध घेवून उल्लेखनीय कामगीरी केली आहे, याकरीता सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.

सदरची कारवाई श्री. लोहीत मतानी, पोलीस अधीक्षक भंडारा, श्री. ईश्वर कातकडे, अपर पोलीस अधीक्षक भंडारा यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री. नितीन चिंचोळकर, सपोनि एन. एच. तुरकुडे, पोहवा राजु दोनोडे, पोहवा कैलाश पटोले, अमोल खराबे, महीला पोहवा अर्चना कुथे, किर्ती तिवारी, पोशि योगेश ढबाले, कौशिक गजभिये सर्व स्थानिक गुन्हे शाखा, भंडारा यांनी केलेली आहे.