‘स्थानिक गुन्हे शाखेचा दणका’ पवनी येथील अवैध जुगार अड्डयावर धाड १८ आरोपींकडुन ६,५८,८५०/- रु. चा मुद्देमाल जप्त

‘स्थानिक गुन्हे शाखेचा दणका’ पवनी येथील अवैध जुगार अड्डयावर धाड १८ आरोपींकडुन ६,५८,८५०/- रु. चा मुद्देमाल जप्त

पोलीस अधीक्षक श्री. लोहीत मतानी यांनी भंडारा जिल्हा येथील कार्यभार स्वीकारल्यापासून अवैध व्यवसायांवर धाडी घालुन अवैध व्यवसाय समुळ नष्ट करण्याच्या सुचना दिलेल्या आहेत. त्याअनुषंगाने भंडारा जिल्हयातील अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले असुन त्यांनी भंडारा जिल्हयातुन काढता पाय घेतला आहे. तरीसुध्दा काही अवैध व्यवसाय करणारे व्यायसायीक लपुन छपुन अवैध व्यवसाय करीत असल्याने त्यांचेवर प्रभावी कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक, भंडारा यांनी अधिनस्थ सर्व अधिकाऱ्यांना दिलेले आहेत.

दिनांक ०९/१०/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन चिंचोळकर यांना पवनी शहरात कोरंभी रोडवरील एका रेस्टारेंट मध्ये जुगाराचा अवैध अड्डा सुरु असल्याबाबत गोपनीय माहिती प्राप्त झाल्याने त्यांनी वेळीच स्थानिक गुन्हे येथील पोलीस उपनिरीक्षक प्रिती कुळमेथे, पोलीस हवालदार तुळशिदास मोहरकर, विजय राऊत, प्रशांत कुरंजेकर, पोलीस नाईक प्रफुल कठाणे, संदिप भानारकर, अंकोश पुराम, पोलीस शिपाई सुनील ठवकर, यांचे पथक तयार करुन सदर पथकास मिळालेल्या गोपनीय माहीतीप्रमाणे कारवाई करण्याचे आदेशीत कले. त्यावरुन सदर पथकाने वेळीच रवाना होवुन पोलीस स्टेशन पवनी येथील पोलीस निरीक्षक नरेंद्र निस्वादे यांना मिळालेली माहीती कळवुन नियोजनपुर्वक सापळा रचुन पवनी शहरातील कोरंभी रोडवरील त्र्यंबकराज रेस्टारेंट येथील दुसऱ्या माळयावर धाड घातली असता त्यात १) सोनु उर्फ त्रिभुवन कोठीराम दंडारे वय ३० वर्षे रा. ताडेश्वर वार्ड पवनी, २) नौशाद निजाम शेख वय ३० वर्षे रा. कोसरा ३) विकास तुळशिराम घरडे वय ३१ वर्षे रा. शेळी ४) छगन दौलत कठाणे वय ३१ वर्षे रा. तई (बु) ५) वैभव बाबुलाल नान्हे वय २८ वर्षे रा. अडवाळ ६) जागेश्वर बाबुराव राखडे वय ४६ वर्षे रा. ढोलसर ७) विकास ज्ञानेश्वर कांबळे वय ३५ वर्षे रा. ब्रम्ही ८) अरविंद प्रभु फुंडे वय ३२ वर्षे रा. तई (बु) ९) सरफराज उर्फ सोनु ईब्राहीम खॉ पठाणे वय ३१ वर्षे रा. मासळ १०) रोहीत रविंद्र मेश्राम वय २२ वर्षे रा. लाखांदुर ११) तेजराम बळीराम कामथे वय २६ वर्षे रा. तई (ब) १२) रत्नहुस पुंडलिक कुंभरे वय २४ वर्षे रा. मासळ १३) पियुष प्रेमदास गिन्हेपंजे वय २० वर्षे रा. मोखारा १४) बटि उर्फ प्रणय जीवन काटेखाये वय २४ वर्षे रा. ब्रम्ही १५) यश भारत तिमांडे वय २० वर्षे रा. ब्राम्हणी १६) सुरज भाउराव नंदेश्वर रा. मांढळ १७) पंकज अमृत नखाते वय ३४ वर्षे रा. मोखारा १८) गणेश महादेव लांजेवार वय ४० वर्षे रा. ब्राम्हणी असे मिळुन तासपत्यांवर पैशाची बाजी लावुन जुगार खेळतानी मिळुन आले. पोलीसांनी त्यांचेकडून ०१ चारचाकी वाहन, ०३ दुचाकी वाहन, १५ मोबाईल फोन, नगदी रक्कम ३८५९० /- रुपये, विदेशी मद्याच्या १८० मि. ली. च्या ४५ बॉटल कि. ७४१०/-रु. तसेच जुगाराचे ईतर साहित्य असा एकुण ०६,५८,८५०/- रु. चा मुद्देमाल जप्त करुन त्यांचेविरुध्द पोलीस स्टेशन पवनी येथे अप. क्र. ३८० / २०२३ कलम ४, ५ महाराष्ट्र जुगार कायदा सहकलम ६५ (ई) महाराष्ट्रदारुबंदी कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. असुन पुढील तपास पोलीस स्टेशन पवनी हे करीत आहेत.

सदरची कारवाई श्री. लोहीत मतानी, पोलीस अधीक्षक भंडारा, श्री. ईश्वर कातकडे, अपर पोलीस अधीक्षक भंडारा यांचे

मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री. नितीन चिंचोळकर, पोलीस उपनिरीक्षक प्रिती कुळमेथे, पोहवा तुळशिदास मोहरकर, विजय

राउत, प्रशांत कुरंजेकर, पोलीस नाईक प्रफुल कठाणे, संदिप भानारकर, अंकोश पुराम, पोलीस शिपाई सुनील ठवकर, स्थानिक

गुन्हे शाखा, भंडारा तसेच पोलीस निरीक्षक श्री. नरेंद्र निस्वादे, पोलीस उपनिरीक्षक पठाण, पोहवा. शिवणकर, पोना कुझेंकर पोलीस स्टेशन पवनी यांनी केलेली आहे..