कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता जिल्हा कार्यकारी समितीची बैठक संपन्न

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता जिल्हा कार्यकारी समितीची बैठक संपन्न

 

        भंडारा,दि.6 : कौशल्य, रोजगार, उद्योजकता यांचे सोबत नाविन्यतेस चालना देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता जिल्हा कार्यकारी समितीचे पुर्नगठन करण्यात आलेले आहे. त्यानुसार कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता जिल्हा कार्यकारी समितीची सभा काल  जिल्हाधिकारी  कार्यालयात  संपन्न झाली. या सभेमध्ये मागील सभेच्या इतिवृत्तांचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर ग्रामपंचायत स्तरावरील “प्रधानमंत्री उद्योजकता कौशल्य विकास केंद्र” बाबत सदस्य सचिव यांनी समितीसमोर सादरीकरण केले. किमान कौशल्य विकास योजना सन 2023-24 अंतर्गत कौशल्य प्रशिक्षणाचे कार्यादेशाबाबत चर्च करण्यात आली.

         यावेळी जिल्हाधिकारी यांनी जिल्हयातील 15 ते 45 वयोगटातील उमेदवारांना किमान कौशल्य विकास कार्यक्रम सन 2023-24 करीता विविध तांत्रीक अभ्यासक्रमाचे कौशल्य विकास प्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या नोंदणीसाठी  https://forms.gle/nDRhuaBysx65LXex8 या गुगल फॉर्मवर नोंदणी करण्याचे आवाहन केले.

          त्यानंतर महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी मुंबई यांचेमार्फत सुरु असलेल्या महाराष्ट्र स्टुडंन्ट इन्नोव्हेशन चॅलेंज बाबत सदस्य सचिव यांनी सभेमध्ये माहिती दिली. राज्यातील विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजचे आयोजन करण्यात आलेले आहे. राज्यातील महाविद्यालयीन/आयटीआय मधील विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांचा शोध घेणे व त्यांचे नवउद्योजकतेचे स्वप्न साकार करण्यासाठी योग्य ते पाठबळ पुरवणे हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे समितीचे सदस्य सचिव  सुधाकर झळके यांनी समीतीस अवगत केले.