एक होंडा कंपनीची अॅक्टीवा सह १,७५,०००/- रु. चा मुद्देमाल.

एक होंडा कंपनीची अॅक्टीवा सह १,७५,०००/- रु. चा मुद्देमाल.

अ.क्र. १.४.२ गुन्हयातील संबंधीत प्रकरण असे आहे की, दिनांक १३/०९/२०२३ रोजी रात्र दरम्यान पो. नि. नितीनकुमार चिंचोळकर, पो. हवा. प्रदीप डहारे, पो हवा, कैलास पटोले, पो.हवा. किशोर मेश्राम, पो.अ. सचिन देशमुख, पो.अं. कृणाल कडव, चापोना. आशिष तिवाडे हे अवैध जनावरे वाहतुकीवर कारवाई संबंधाने पेट्रोलींग करीत असतांना गोपनीय खबर प्राप्त झाली की, “साकोली कडुन नागपूर कडे गोवंश जातीचे जनावरे कत्तलीकरीता पिकअप वाहनाने नेत असुन त्यासाठी अंदाजे ३ ते ४ इसम अवैध जनावरांचे वाहतुक सुरळीत होण्यासाठी रोडवर हालचाली पाहण्यासाठी राहतात व जनावरांचे गाड्या पास करतात” अश्या इसमांचा व जनावरांचे वाहनांचा शोध घेत असतांनी एक सुपर स्प्लेंडर गोटार सायकलनी महामार्गाने भंडारा कडे येतांनी मिळुन आला त्याचे हालचाली संशयास्पद वाटल्याने त्याची सखोल चौकशी केली असता त्याने आपले नाव समीर सुलतान शेख, वय १८ वर्ष, रा. गोरेगाव, जि. गोंदिया असे सांगीतले. सदर इसम वापरत असलेली मोटरसायकलचे चेसीस नंबर पोर्टलवर चेक केले असता सदर मोटरसायकल पोलीस स्टेशन लाखनी येथील चोरीच्या गुन्हयातील असल्याचे आढळून आल्याने मोटरसायकल जप्तीपत्रकाप्रमाणे जप्त करण्यात आले. त्याने सोबत इतर दोन साथीदार असल्याचे सांगुन ते मारोती ओमनीने गोवा ढाव्या समोरच्या ओवरब्रिजचे रोडचे बाजुला जनावरांचे गाड्या पास करण्यासाठी थांबुन असल्याचे सांगीतल्याने सदर पथकाने लगेच नमुद मारोती ओमनी वाहनाचा शोध घेवुन त्यामधील दोन इसम यांना | विचारपुस केली असता त्यांनी त्यांचे नाव १) कुणाल दिलीप बुराडे, वय २१ वर्ष, रा. लाखनी, २) श्रीकांत तुळशीराम नगरकर वय २५ वर्ष, रा. लाखनी असे सांगीतले. त्यांना सखोल विचारपुस केली असता त्यांनी पोलीस स्टेशन लाखनी येथे दाखल गुन्हयात दिनांक ०४/०९/२०२३ चे रात्री दरम्यान बरडकिन्ही गोशाळेतली ५ लहान मोठे गोवंश जनावर चोरी करून मयुर अशोक राऊत रा. गोंदिया यास विक्री केल्याचे सांगीतल्याने त्यांचेकडुन एक मारुती ओमणी वाहन जप्ती पत्रकाप्रमाणे जप्त करून ताब्यात घेण्यात आले.

अशाप्रकारे वर नमुद आरोपीतांनी पोलीस स्टेशन लाखनी अंतर्गत गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यावरून वर नमुद गुन्हयातील चोरीची मोटारसायकल किंमती ३५,०००/- रुपये, व जप्त मारोती ओमणी वाहन किंमती १,२०,०००/- रु. असा एकुण १,५५,०००/- रु. चा मुद्देमाल जप्ती कारवाई करून पुढील तपासकरिता पोलीस स्टेशन लाखनी यांचे ताब्यात दिले आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. लोहित मतानी, अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात पो. नि. नितीनकुमार चिंचोळकर, पो. हवा. प्रदीप डाहारे, पो. हवा. कैलास पटोले, पो. हवा. किशोर मेश्राम, पो.अ. सचिन देशमुख, पो.अं. कृणाल कडव, चापोना. आशिष तिवाडे सर्व स्थानिक गुन्हे शाखा, भंडारा यांनी केलेली आहे.

अ.क्र. ३ व ४ गुन्हयातील संबंधीतप्रकरण असे आहे की, दिनांक १४/०९/२०२३ रोजी आमचे आदेशावरून पो. हवा. नितीन महाजन, पो. हवा. श्रीकांत मस्के, पो. अं. मंगेश मालोदे, पो. अं. जगदीश श्रावणकर, चा. पो. अं. कौशीक गजभिये, सर्व स्थानिक गुन्हे शाखा, भंडारा हे अउघड गुन्हे, मोटरसायकल चोरीचे गुन्हयातील आरोपीतांचा शोधसाठी पेट्रोलींग करीत असतांना गोपनीय खबर प्राप्त झाली की, एकोडी फाटयावर एक इसम मोटारसायकलची विक्री करीत आहे, अशा खबरेवर नमुद ठिकाणी खबरेची शहानिशा करणेकामी गेले असता तेथे आरोपी तेजस उर्फ तेजराम आडे, वय २७ वर्ष, रा. कोंढी / टोली, ता. पवनी हा मिळाल्याने त्यास ताब्यात घेवून सविस्तर विचारपुस केली असता त्याने पोलीस स्टेशन साकोली अंतर्गत दोन मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिल्याने त्याचे ताब्यातुन एक बजाज कंपनीची अवेंजर मो.सा. किंमती १,५०,०००/- रु. व एक होन्डा कंपनीची अॅक्टीवा मो.सा. किंमती २५,०००/- रु. जप्तीपत्रकाप्रमाणे जप्त करून ताब्यात घेतले.

वर नमुद आरोपी तेजराम आडे याने पोलीस स्टेशन साकोली अंतर्गत गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यावरून वर नमुद गुन्हयातील चोरीची एक बजाज कंपनीची अवेंजर मो.सा. किंमती १,५०,०००/- रु. व एक होन्डा कंपनीची अॅक्टीवा मो.सा. किंमती २५,०००/- रु. असा एकुण १,७५,०००/- रू. चा मुद्देमाल जप्ती कारवाई करून पुढील तपासकरिता पोलीस स्टेशन साकोली यांचे ताब्यात दिले आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. लोहित मतानी, अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात पो. नि. नितीनकुमार चिंचोळकर पो. हवा. नितीन महाजन, पो. हवा. श्रीकांत मरके, पो. अं. गंगेश मालोदे, पो. अं. जगदीश श्रावणकर, चा. पो. अं. कौशीक गजभिये, सर्व स्थानिक गुन्हे शाखा, भंडारा यांनी केलेली आहे. अशा प्रकारे पोलीस स्टेशन लाखनी आणि साकोली अंतर्गत दाखल एकुण ४ गुन्हे वर नमुद पथकाने उघडकीस आणुन एकुण ३,३०,०००/- रू.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.