जिल्हा जेष्ठ नागरिक समन्वय सनियंत्रण  समिती गठीत

जिल्हा जेष्ठ नागरिक समन्वय सनियंत्रण  समिती गठीत

जाधवराव साठवणे   व हिरामण  लांजेवार यांची नियुक्ती

भंडारा दि.25 : जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा जेष्ठ नागरिक समन्वय व सनियंत्रण  समिती गठीत करण्यात आली आहे.त्यामध्ये जिल्हा जेष्ठ नागरिक महासंघ ,फेस्कॉम यांचे जाधवराव साठवणे यांची सदस्य नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच हिरामण  लांजेवार यांचीही सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

आई-वडील व जेष्ठ नागरिकांच्या चरितार्थासाठी  व त्यांना येणा-या अडचणी सोडविण्यासाठी हि समीती कार्य करते.सहायक आयुक्त,समाज कल्याण हे या समितीचे सदस्य सचिव असतात.जिल्हाधिकारी श्री.योगेश कुंभेजकर  यांच्या मार्गदर्शनाखाली ही समीती कार्य करेल.