“सद्भावना दिवस’’
भंडारा पोलिस प्रशासनातर्फे सद्भावना दिवस साजरा करुन प्रतिज्ञा घेण्यात आली.
भंडारा : – पोलीस अधीक्षक कार्यालय लॉन येथे आज रोजी दिनांक १८/०८/२०२३ रोजी पोलीस अधिक्षक भंडारा मा. लोहित मतानी, अपर पोलीस अधिक्षक भंडारा ईश्वर कातकडे, यांच्या अध्यक्षतेखाली राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन सद्भावना दिवस साजरा करुन प्रतिज्ञा घेण्यात आली.
“मी अशी प्रतिज्ञा करतो की, मी जात, वंश, धर्म प्रदेश किंवा भाषा विषयक भेद न करता सर्व भारतीय जनतेचे भावनिक ऐक्य आणि सामजस्य यासाठी काम करीन. मी आणखी अशी प्रतिज्ञा करतो की, आमच्या मधील वैयक्तीक किंवा सामूहिक स्वरुपाचे सर्व प्रकारचे मतभेद मी हिंसाचाराचा अवलंब न करता विचार विनीयम करुन संविधानिक मार्गानी सोडविन. ”
यावेळी कार्यक्रमाला पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर स्थागुशा भंडारा, राखीव पोलीस निरीक्षक रघुनाथ चौधरी, पोलीस उपनिरीक्षक रमाकांत दिक्षीत जिवीशा भंडारा, पोलीस उपनिरीक्षक रेवतकर पोलीस नियंत्रण कक्ष भंडारा आर. सी पी क्यु. आर. टी. पोलीस शाखेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.