गडचिरोलीतील निवासस्थानी खासदार अशोक नेते यांनी केले ध्वजारोहण

हर घर तिरंगा’फडकावुन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करुया.खासदार अशोक नेते

गडचिरोलीतील निवासस्थानी खासदार अशोक नेते यांनी केले ध्वजारोहण

दि. १४ ऑगस्ट २०२३ :
गडचिरोली:- देशाचे विश्वगौरव पंतप्रधान मान.नरेंद्र मोदी जी यांनी प्रत्येक नागरिकांमध्ये देशभावना जागृत व्हावी यासाठी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात यावा.त्याच बरोबर हर घर तिरंगा या अभियानाला सुरूवात केली.
हर घर तिरंगा फडकवूया अमृत महोत्सव आनंदाने, उत्स्फूर्त प्रतिसादाने, देश भावनेने साजरा करूया व प्रत्येक घरावर अभिमानाने तिरंगा फडकवूया असे आवाहन खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे अशोक नेते यांनी केली आहे.

‘हर घर तिरंगा’ या निमित्ताने खासदार अशोक नेते यांच्या गडचिरोली येथील निवासस्थानी ध्वजारोहण केले .
यावेळी प्रदेश सरचिटणीस एस.टी.मोर्चाचे प्रकाश गेडाम, आदिवासी आघाडी चे जिल्हा सरचिटणीस योगेश कुमरे,बंगाली समाजाचे नेते रतन सरकार, भाजपाचे युवा कार्यकर्ते संजय खेडेकर, रवि शिडाम, भाग्यवान पिपरे,तसेच मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते गण उपस्थित होते.