कौशल्याची मागणी सर्वेक्षण या मोहिमचे आयोजन

कौशल्याची मागणी सर्वेक्षण या मोहिमचे आयोजन

गडचिरोली, दि.10: केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी याकरीता “कौशल्याची मागणी सर्वेक्षण” मोहीम यशस्वीरीत्या राबविणेसाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी कार्यरत आहे. त्यांच्यामार्फत विविध कौशल्य विकास प्रशिक्षण योजना राबविण्यांत येत असतात.
प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान व किमान कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम यासह केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी. याकरीता राज्यातील युवक – युवतींना आवश्यक असलेले आणि त्यांनी मागणी केलेले कौशल्य प्रशिक्षण प्रदान करण्यासाठी आणि प्रशिक्षणामध्ये यशस्वी उमेदवारांना रोजगार – स्वयंरोजगाराच्या संधी अधिकाधिक प्रमाणात उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील युवक – युवतींना उद्योगांच्या मागणीवर आधारीत ( Demand driven ) कौशल्य प्रशिक्षण पुरविण्यासाठी “कौशल्याची मागणी सर्वेक्षण ” या मोहिमचे आयोजन करण्यांत आले आहे.
त्याकरीता सदर सर्वेक्षण मोहिममध्ये नोंदणी करण्यासाठी गडचिरोली जिल्हयातील कोणत्याही क्षेत्रामधून दहावी उत्तीर्ण ते अंतिम शिक्षण उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण झालेले 16 ते 45 वयोगटातील सर्व विद्यार्थी /उमेदवार हे या कोर्सेसची मागणीसाठी सर्वेक्षणामध्ये नोंदणी करू शकतात. त्यासाठी ( Student Skill Need Assessment )गुगल फॉर्म तयार करण्यांत आला असून Google Form Link :-  https://forms.gle/kYtSxbVhrZ2s7z6q8 अशी आहे . यामध्ये उमेदवार / विद्यार्थ्यांनी आपापल्या आवडीनूसार सर्व क्षेत्रातील सेक्टर नूसार किमान 5 कोर्सेसची मागणी करू शकतात. त्यानूसार कौशल्य प्रशिक्षण पुरविण्यांत येईल.
तरी, जास्तीत – जास्त विद्यार्थी / उमेदवारांनी आवश्यक कोर्सेसची मागणी करण्याकरीता खालील गुगल लिंक किंवा सदर लिंकच्या QR Code चा वापर करून नोंदणी करावे. असे, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे, सहायक आयुक्त, यांनी कळविले आहे.
Google Form Link :-  https://forms.gle/kYtSxbVhrZ2s7z6q8
QR Code