ना. सुधीर मुनगंटीवार यांचेकडून जयश्री चांदेकर यांना एका तासाच्‍या आत शिलाई मशीनचे वितरण.

ना. सुधीर मुनगंटीवार यांचेकडून जयश्री चांदेकर यांना एका तासाच्‍या आत शिलाई मशीनचे वितरण.

जयश्री चांदेकर यांनी मानले ना.मुनगंटीवार यांचे आभार

चंद्रपूर,दि.८- सौ. जयश्री चांदेकर या होतकरू भगिनीने रोजगार उपलब्‍ध होण्‍याच्‍या दृष्टिकोनातून राज्‍याच्‍या वने, सांस्कृतिक कार्य व मत्‍स्‍य व्‍यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांना शिलाई मशीन उपलब्‍ध करून देण्‍याची विनंती केली. त्‍यानुसार त्‍यांना एका तासाच्‍या आत रोजगार उपलब्‍ध होण्‍याच्‍या दृष्टिकोनातून ना.सुधीर मुनगंटीवार यांचेकडून शिलाई मशीन उपलब्‍ध करून देण्‍यात आली.

दिनांक ७ ऑगस्‍ट २०२३ रोजी भारतीय जनता पार्टी कार्यालय चंद्रपूर येथे सुधीर मुनगंटीवार यांचा जनसंपर्क सुरू असताना जयश्री चांदेकर यांनी त्‍यांची हलाखीची आर्थिक परिस्थिती विशद करून रोजगार उपलब्‍ध करून देण्यासाठी शिलाई मशीन उपलब्‍ध करून देण्‍यात यावी अशी विनंती केली. त्‍यानुसार कुठल्‍याही प्रकारचा विलंब न करता तत्‍परतेने त्‍यांना एका तासाच्‍या आत शिलाई मशीन उपलब्‍ध करून देण्‍यात आली.

जयश्री चांदेकर या होतकरू भगिनी असून त्‍यांच्‍या कुटूंबाचा संपूर्ण भार त्‍यांचेवर आहे. त्‍यांचे बाळ लहान असल्‍याने त्‍या घराबाहेर पडून नोकरी करू शकत नाही. त्‍यामुळे घरीच व्‍यवसाय सुरू करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्‍यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्‍याकडे शिलाई मशीन उपलब्‍ध करून देण्‍याची विनंती केली होती. त्‍यानुसार त्‍यांना तात्‍काळ शिलाई मशीन उपलब्‍ध करून देण्‍यात आली यावेळी भाजपा महानगर जिल्‍हाध्‍यक्ष राहुल पावडे, प्रज्‍वलंत कडू, सुरज पेदुलवार, सुनिल डोंगरे, सत्‍यम गाणार, पवन ढवळे आदींची उपस्थिती होती. ताबडतोब सहकार्य केल्याबद्दल जयश्री चांदेकर यांनी ना.सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले.