इच्छुक शेतकरी उत्पादक संघ/ कंपनीकडून गोडावून बांधकामाकरिता प्रस्ताव आमंत्रीत

इच्छुक शेतकरी उत्पादक संघ/ कंपनीकडून गोडावून बांधकामाकरिता प्रस्ताव आमंत्रीत

                  भंडारा दि. 2: राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान भात व कडधान्य सन 2023-24 अंतर्गत स्थानिक पुढाकाराच्या बाबी या घटकामध्ये शेतकरी उत्पादन कंपनी, संघ यासाठी 250 मेट्रीक टन क्षमतेचे गोडावून बांधकामासाठी 50% किंवा जास्तीत जास्त 12.50 लाखांपर्यंत यापैकी जे कमी असेल ते अनुदान देय आहे. इच्छुक शेतकरी उत्पादक संघ/ कंपनी यांनी त्यांच्या तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्फत विहित प्रपत्रात नोंदणी प्रमाणपत्र जोडून आपले तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात 18 ऑगस्टपर्यंत प्रस्ताव सादर करावे.

योजनेचा लाभ घेतांना बँक कर्जाशी निगडित असल्यामुळे अर्जदारांनी प्रस्ताव सादर करतांना केंद्र शासनाच्या ग्रामीण भंडारण योजना, नाबार्डच्या मार्गदर्शक सुचनानुसार बँकेकडे प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. बँकेने सदर प्रकल्प मंजुर केल्यानंतरच संबधीत अर्जदारांना अनुदान देण्यात येईल. यासाठी इच्छुक लाभार्थ्यांनी अर्ज महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांकडून अथवा सार्वजनिक विभागाच्या मान्यताप्राप्त डिझाईन्स, स्पेसीफिकेशन व खर्चाच्या अंदाजपत्रकासह गोदाम बांधकामाच्या प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे, असे  जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संगीता माने यांनी  कळविले आहे.