गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील कोतवाल भरती प्रक्रियेबाबत जाहीर आवाहन
गडचिरोली, दि.01: गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्याअंतर्गत कोतवाल (पेसा अंतर्गत) 14 रिक्त असलेल्या जागेकरीता पदभरती करावयाची असून अनुसुचित जमाती संवर्गातील आवश्यक अर्हताधारक व्यक्तीकडून पारंपारिक (ऑफलाईन) पद्धतीने दिनांक 01 ऑगस्ट 2023 ते 10 ऑगस्ट 2023 पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहे. सदर विहित नमुन्यातील अर्ज तहसिल कार्यालय, कोरची (कोतवाल भरती कक्ष) मध्ये उपलब्ध् आहेत. कोतवाल या पदाचे सरळसेवा भरती प्रक्रियेचा सविस्तर जाहिरनामा तहसिल कार्यालय, कोरची/पंचायत समिती, कोरची/ नगरपंचायत कोरची, संबंधीत ग्रामपंचायत कार्यालय व तलाठी यांचे कार्यालयामध्ये नोटिस बोर्डावर उपलब्ध करण्यात आलेला आहे. तरी स्थानिक उमेदवारांनी पात्रतेच्या अटीनुसार ऑफलाईन पद्धतीने परिक्षाशुल्कासह अर्ज तहसिल कार्यालय, धानोरा येथे सादर करावा असे सदस्य सचिव कोतवाल निवड समिती तथा तहसिलदार, कोरची यांनी कळविले आहे