गडचिरोली मा.मा.तलाव (गोकुळनगर) 100 टक्के भरल्याने तलावालगतच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

गडचिरोली मा.मा.तलाव (गोकुळनगर) 100 टक्के भरल्याने तलावालगतच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

गडचिरोली,दि.22: सध्या पावसाळा सुरु असल्याने सतत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे दिनांक 20 जुलै 2023 रोजी गडचिरोली शहरालगत गोकुळनगर येथील जलसंपदा विभागांतर्गत असलेला मा.मा. तलाव 100 टक्के भरलेला असुन तलावाचे सांडव्यावरुन 2.00 सेंटीमीटर विसर्ग सुरु आहे. पुढील काही दिवस हवामान खात्याने पावसाची शक्यता दर्शविलेली आहे. त्यामुळे सांडव्यावरुन विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. तरी तलावाच्या काठी असलेल्या व तलावाच्या सांडव्यालगत असलेल्या सर्व नागरिकांना उचित सतर्कता बाळगणे संदर्भात सावधानतेचा इशारा देण्यात येत आहे. असे उपविभागीय अधिकारी पाटबंधारे उपविभाग, चामोर्शी यांनी कळविले आहे.