आजपासून घरोघरी जाऊन मतदान केंद्रस्तरीय अधिकारी करणार मतदार पडताळणी

आजपासून घरोघरी जाऊन मतदान केंद्रस्तरीय अधिकारी करणार मतदार पडताळणी

भंडारा दि.20 भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार भंडारा जिल्ह्यातील 60-तुमसर, 61-भंडारा व 62-साकोली या विधानसभा मतदार संघात 01 जानेवारी, 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

मतदार नोंदणीपासून एकही नागरिक वंचित राहू नये, यासाठी मा. भारत निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार घरोघरी भेट देऊन नव मतदार नोंदणी व मतदार पडताळणी दिनांक 21/07/2023 ते 21/08/2023 या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी त्यांच्या संबंधित यादी भागात असलेल्या सर्व मतदारांच्या तपशिलाची पडताळणी संबंधित कुंटूंब प्रमुखा मार्फेंत भरुन अ)नोंदणी न केलेले पात्र मतदार (01 जानेवारी, 2023 रोजी पात्र) आ)संभाव्य मतदार (1 जानेवारी, 2024 रोजी पात्र) इ)संभाव्य मतदार (पुढील तीन अर्हता दिनांकावर पात्र) ई)एकापेक्षा अधिक नोंदी/मयत/मतदार/कायमस्वरुपी मयत मतदार उ)मतदार यादीतील नोंदीत दुरुस्ती याबाबतची पडताळणी करण्याकरीता मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांचे मार्फेंत प्रत्येक घरी भेट देण्यात येणार आहे

मतदार नोंदणीपासून एकही नागरिक वंचित राहू नये याकरीता मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना मतदार नोंदणीची पडताळणी व नवमतदार नोंदणी करीता नागरीकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले आहे.