महायुतीचे सरकार आपसी रस्सीखेचामुळे कोसळणार-हेमंत पाटील

महायुतीचे सरकार आपसी रस्सीखेचामुळे कोसळणार-हेमंत पाटील

मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा टळल्याने नाराजीत भर

मुंबई, १४ जुलै २०२३

शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस फोडून स्थापन झाले महायुती सरकार मध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.या सरकारमधील आपसी रस्सीखेचामुळे ते कोसळेल,असा दावा इंडिया अगेन्स्ट करप्शनचे (आयएसी) राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी शुक्रवारी केला.गत वर्षभरापासून मंत्रिमंडळ विस्ताराची चातक पक्षाप्रमाणे वाट बघणारे आमदार राष्ट्रवादीच्या फुटीर गटामुळे चिंतेत आहे.आपले मंत्रीपद हुकणार हे अनेकांना आता कळून चुकले आहे.अशात या नाराज आमदारांची नाराजी सरकारला परवडणारी नाही.सरकार मधून काही आमदार बाहेर पडले तरी सरकारला धोका नाही. पंरतु,आमदारांच्या नाराजीचा फायदा घेत विरोधकांकडून सरकार पाडण्याचा प्रयत्न केला जाईल.यात विरोधक यशस्वी होती, असे भाकित पाटील यांनी व्यक्त केले.

 

आठवड्याभरापासून बिन खात्यांच्या मंत्र्यांमुळे राज्यकारभार वाऱ्यावर आहे. राष्ट्रवादीच्या फुटीर गटाला अद्याप ही खाते वाटन न झाल्याने सरकार मध्ये सर्व काही आलबेल नाही.अजित पवार आणि प्रफुल्ल पटेलांनी नुकतीच दिल्लीवारी करीत अमित शहांकडे नाराजी व्यक्त केली आहे.अशात चांगले खाते मिळावे यासाठी पवारांची लॉबिंग सुरू आहे. मात्र,आपल्या तोंडी आलेला घास हिरावून घेण्याचा प्रयत्न होत असल्याने बंडखोरांमध्ये अस्वस्थता आहे.अशात एकनाथ शिंदे यांचे राजकीय भविष्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याने त्यांच्याकडून मोठा निर्णय घेतली जाण्याची शक्यता आहे.अशात सरकार अस्थिर होवू शकते,असा दावा पाटील यांनी केला.अजित पवारांकडे राज्याचे नेतृत्व सुपूर्द करण्याचे मनसुबे भाजपचे आहे. अशात येत्या काळात मोठा राजकीय गोंधळ बघायला मिळण्याची शक्यता असल्याचे पाटील म्हणाले.