आस्थपनेवरील कर्मचाऱ्यांची माहिती ईआर-1 मध्ये सादर करावी

आस्थपनेवरील कर्मचाऱ्यांची माहिती ईआर-1 मध्ये सादर करावी

           भंडारा दि.10: जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडे आपल्या आस्थपनेवरील कर्मचाऱ्यांची सांख्यिकी माहिती प्रत्येक तिमाहिस नमुना ईआर -1 मध्ये नियमितपणे पाठविणे बंधनकारक आहे.

          मार्च व जून 2022 रोजी संपलेल्या तिमाहीची नमुना 1 मधील त्रैमासिक सांख्यिकी माहिती, सर्व सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय व निमशासकीय तसेच खाजगी क्षेत्रातील आस्थापनांकडून त्यांच्या आस्थापनेवर सर्व कर्मचाऱ्यांची पुरुष व स्त्री व एकुण अशी सांख्यिकी माहिती संकलनाचे काम जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयाद्वारे सुरू आहे. यासाठी अशा आस्थापनांकडून 100 टक्के प्रतिसाद मिळणे आवश्यक असल्याने, सदर माहिती सर्व संबंधितांनी 31 ऑगस्ट 2023 पर्यत या विभागाच्या www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने भरावी, असे आवाहन सहायक आयुक्त सुधाकर झळके यांनी केले आहे.