विक्रीसाठी आणलेले Asiatic soft shell turtle या दुर्मीळ प्रजातीचे कासवाची सुटका

विक्रीसाठी आणलेले Asiatic soft shell turtle या दुर्मीळ प्रजातीचे कासवाची सुटका

 

पोलीस स्टेशन गोंडपिपरी येथील ठाणेदार श्री जिवन राजगुरु, सहा. पोलीस निरीक्षक यांना मिळालेल्या गोपनिय माहितीचे आधारे मौजा भंगारपेठ येथील संशयीत इसम नामे प्रमोद भगाकर पोटे याचे घरी पंचासमक्ष छापा टाकुन घराची झडती घेतली असता त्याचे घरात एक नग Asiatic soft shell turtle या दुर्मीळ प्रजातीचे कासव विक्रीसाठी बाळगुन असल्याचे मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्याने सदरचे कासव इतर इसम नामे रविंद्र व्यंकोजी मडपल्लीवार वय 35 वर्षे रा. शिवणी देशपांडे ता.गोंडपिपरी याचे कडुन घेतले असल्याचे माहिती दिली आहे. यावरुन इसम नामे (1) प्रमोद भगाकार पोटे, वय 37 वर्ष, रा. भंगारपेठ ता. गोंडपिपरी (2) रविंद्र व्यंकोजी मडपल्लीवार वय 35 वर्ष रा. शिवणी देशपांडे ता.गोंडपिपरी यांना तसेच एक नग रुपये 25000 /- रुपये किंमतीचा Asiatic soft shell turtle या दुर्मीळ प्रजातीचे कासव ताब्यात घेवुन वन परिक्षेत्र अधिकारी, धाबा परिक्षेत्र ता.गोंडपिपरी यांना पुढील कायदेशीर कारवाई करण्यासाठी स्वाधीन करण्यात आले आहे.

 

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री रविंद्रसिंह परदेशी, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु हयांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक श्री जिवन राजगुरु, पोहवा / 1742 वंदीराम पाल, पोना / 577 नंदकिशोर माहुरकर, पोअं / 594 अनुप निकुरे, पोअं / 2211 प्रेम चव्हाण पो.स्टे. गोंडपिपरी तसेच स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर चे पोलीस निरीक्षक श्री महेश कोंडावार, पोउपनि विनोद भुरले, पोहवा प्रकाश बल्की, सुभाष गोहोकार आणि सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार मुजावर अली व कार्तीक खनके यांनी केली आहे. चंद्रपूर पालास