39,61,368 रुपये किमतीच्या 394.835 किलो गांजा सह 29.579 ब्राऊन शुगर चा नाश

39,61,368 रुपये किमतीच्या 394.835 किलो गांजा सह 29.579 ब्राऊन शुगर चा नाश

 

अमली पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य साधुन दिनांक 26/06/2023 रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. लोहीत मतानी यांच्या अध्यक्षतेखाली अमली पदार्थाचा नाश करण्यात आला. सन 2013 ते सन 2021 पावेतो भंडारा जिल्ह्यात दाखल असलेल्या गुन्ह्यापैकी न्यायालयाने निपटारा केलेल्या एकुण 16 गुन्ह्यातील 39,61,368/-रुपये किमतीच्या 394.835 किलो गांजा सह 29.579 ब्राऊन शुगर चा नाश आज पोलीस परेड ग्राऊंड भंडारा येथे करण्यात आला. एकुण 16 गुन्ह्यांपैकी 10 गांजा बाबत आहेत तर उर्वरीत 06 गुन्हे हे ब्राऊन शुगर चे आहेत.

 

अमली पदार्थ नाश करण्याकरिता चार सदस्यीय समीती गठीत करण्यात आली ज्यात पोलीस अधीक्षक श्री. लोहीत मतानी हे अध्यक्ष तर अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधीकारी डॉ. श्री. अशोक बागुल व पोलीस निरीक्षक श्री. नितीनकुमार चिंचोळकर हे सदस्य होते. संपुर्ण कार्यवाही श्री. पी. डी. खुने, अतीरीक्त सत्र न्यायाधीश, भंडारा, श्री. अरविंद हिंगे, तहसीलदार, भंडारा, श्री. एम. डी. तोंडरे, निरीक्षक, वैधमापन शास्त्र विभाग, भंडारा, श्री. अमर मुनेश्वर, क. लि. प्रदुषण मंडळ, भंडारा व दोन सरकारी पंच श्री. हेमंत बांगडकर, वनपाल व नितीन गणवीर वनमजुनर, वन परीक्षेत्र भंडारा, यांच्या निरीक्षणात पोलीस हवालदार नितीन शिवनकर, प्रदीप डाहारे, रमेश बेदुरकर, यांनीकेली.