कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फंत महाराष्ट्र राज्य नाविन्यपुर्ण स्टार्टअप धोरण जाहीर

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फंत
महाराष्ट्र राज्य नाविन्यपुर्ण स्टार्टअप धोरण जाहीर

गडचिरोली, दि.03:राज्यातील नाविन्यपूर्ण संकल्पना आणि नवउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फंत महाराष्ट्र राज्य नाविन्यपुर्ण स्टार्टअप धोरण जाहीर करण्यांत आलेले आहे. सदर धोरणाच्या माध्यमातून राज्यामध्ये स्टार्टअप परिसंस्थेच्या विकासासाठी पोषक वातावरण निर्मिती करून त्यातून यशस्वी नवउद्योजक घडविण्यासाठी इन्क्युबेटर्सची स्थापना व विस्तार , गुणवत्ता परीक्षण व स्टार्टअप्सना बौध्दीक मालमत्ता हक्कासाठी अर्थसहाय्य, ग्रँड चॅलेंज , स्टार्टअप वीक यांसारख्या अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यांत येते.
नाविन्यता , कल्पकता यांना भौगोलिकतेच्या मर्यादा नसतात. त्या कुठेही यशस्वी होउु शकतात. नवकल्पनांना योग्य पाठबळ मिळण्याची आवश्यकता असते. परंतू योग्य व्यासपीठ व मार्गदर्शनाअभावी चांगल्या कल्पना प्रत्यक्षात उतरू शकत नाहीत. राज्यातील विद्यार्थ्यांना नवसंकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फंत महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजचे आयोजन करण्यांत येत आहे.

उदिदष्ट :- राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांचा शोध घेणे व त्याचे नवउद्योजकतेचे स्वप्न
साकार करण्यासाठी योग्य ते पाठबळ पुरविणे हे या उपक्रमाचे मुख्य उदिदष्ट आहे.
पात्रता :-
1. राज्यातील कोणत्याही महाविद्यालय अथवा औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे सध्या शिक्षण घेत असलेले
विद्यार्थी / विद्यार्थिनी / जास्तीत जास्त 3 विद्यार्थ्यांचा समूह.
2.अर्ज करण्यासाठी विद्यार्थी / विद्यार्थिनी समूहाकडे नाविन्यपुर्ण संकल्पना असणे आवश्यक आहे.
टप्पे :-
 टप्पा 1 :- संस्थांची नोंदणी व संस्थास्तरावर संकल्पनांची निवड
शैक्षणिक संस्थांची नोंदणी ( https://schemes.msins.in ) – दिनांक.15 जुलै ते 15 ऑगस्ट-2023
विद्यार्थ्यांकडून अर्जाची मागणी ( https://schemes.msins.in ) दिनांक.1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट-2023
संस्थास्तरावर सादरीकरण ( https://schemes.msins.in ) दिनांक.15 जुलै ते 15 ऑगस्ट-2023
प्रत्येक संस्थेतील सवोत्कृष्ट 2 संकल्पनांची निवड दिनांक.10 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर -2023

 टप्पा 2 :- जिल्हास्तरीय सादरीकरण व संकल्पनांची निवड
प्रत्येक जिल्हयातील उत्तम 100 संकल्पनांची सादरीकरणासाठी निवड
100 संकल्पनांची प्रशिक्षण कार्यशाळा
100 संकल्पनांचे जिल्हास्तरावर सादरीकरण
जिल्हास्तरावर सवोत्कृष्ट 10 विजेत्यांची निवड 10 विजेत्यांना 1 लाख रूपयांचे बिज भांडवल

 टप्पा 3 :- विशेष इन्क्युबेशन प्रोग्राम
प्रत्येक जिल्हयातील 10 अश्या एकुण 360 नवउद्योजकांना 12 महिन्यांचा विशेष इन्क्युबेशन प्रोग्राम
इन्क्युबेशन प्रोग्राम नंतर 360 संकल्पनांचे राज्यस्तरीय सादरीकरण
उत्तम 10 विजेत्यांना रू.5 लाखांचे बीज भांडवल

लाभ व पारितोषिके :-
 जिल्हास्तरावर 10 विजेत्यांना प्रत्येकी रू.1 लाखाचे बीज भांडवल
 राज्यास्तरावर 10 विजेत्या नवउद्योजकांना प्रत्येकी रू. 5 लाखांचे बीज भांडवल
 विशेष इन्क्युबेशन प्रोग्राम
 इतर योजनांचा लाभ
 शैक्षणिक संस्था आणि जिल्हयांना पारितोषिक
अशा प्रकारे उपक्रमाचे टप्पे असून सदर उपक्रमामध्ये सहभाग नोंदविण्यासाठी अधिकाधिक शासकीय संस्था आणि विद्यार्थ्यांनी https://schemes.msins.in या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे,सहायक आयुक्त यांनी केली आहे.