विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने नदीच्या पात्रात ११शेळ्या ठार

विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने नदीच्या पात्रात ११शेळ्या ठार

चिमूर तालुक्यातील बोळधा नदीघटवरील घटना

पाण्यातील मोटारपंप चा वायर लिकेज मुळें पाण्यात विद्युतप्रवाह निर्माण होऊन दुर्दैवी घटना घडली आहे.

 

चिमूर तालुक्यातील नेरीवरून जवळ असलेल्या बोळधा नदिघाटावर कापगते गुरूजी च्या शेतातील नदी डोहात शेतीला सिंचन करण्यासाठी पाण्यातील मोटार पंप आहे सदर पंप चे विद्युत पुरवठा वायर लिकेज झाल्याने डोहातील संपूर्ण पाण्यात विद्युत प्रवाह निर्माण झाला असता अचानक 11 वाजता दरम्यान गावातील काही शेळ्या पाणी पिण्यासाठी आल्या असता त्यांना विद्युत प्रवाहाचा तिव्र झटका लागल्यामुळे नऊ बकऱ्या व दोन बकरे जागीच गतप्राण होऊन ठार झाले यामुळे हजारी रुपयाचे नुकसान झाले असून त्या बकऱ्या बोळधा या गावातील असून सहा लोकांच्या मालकीच्या असल्याची माहिती मिळाली आहे सदर बकऱ्याच्या मृत्यूची चौकशी करून शासनाने नुकसान भरपाई द्यावे अशी मागणी नागरिक करीत आहेत

लोहारा बोळधा मार्गावर मधोमध गोधनी नदीवर पूल बनवला आहे या पुलापासून पाचशे मिटर अंतरावर नदी डोह असून कापगते गुरुजी चे शेत असून याच डोहातून शेतीला सिंचन करण्यासाठी पाणी घेत असतात याच डोहमध्ये पाण्याच्या आतील पाणबुडी मोटार पंप असून आज दि 17 जूनला शेतीला पाणी पुरवठा सुरू असताना सकाळी चरायला सोडलेल्या बकऱ्या ह्या चरत चरत नादिघाटावर आल्या असता पाणी पिण्यासाठी सकाळी 11 वाजता दरम्यान डोहावर आल्या आणी पाणी प्यायला तोंड लावताच त्यांना तीव्र विद्युत झटका लागला असता क्षणात जागेवरच त्यांचा मृत्यू झाला सदर बकऱ्या ह्या झटक्याने काही पाण्यात पडल्या तर काही पाण्याजवळ मरून पडल्या सदर बकऱ्या पडलेल्या पाहून बकरी राखणारा ओरडला असता इतरांना माहिती मिळाली पंप बंद करून सर्व बकऱ्यांना बाहेर काढण्यात आले सदर ठिकाणी घटनेची माहिती होताच विद्युत विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी चौकशी केली असता पाण्यातील मोटार पंपाच्या विद्युत पुरवठा करणाऱ्या वायर चा ठेप पट्टी निघाल्या मुळे विद्युत प्रवाह पाण्यात आल्याने सदर दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे सुदैवाने कोणीही मनुष्य या ठिकाणी आला नसल्याने अनुचित प्रकार घडला नाही वृत्त लिहिपर्यंत कुणीही जवाबदार अधिकारी घटनास्थळी दाखल झाले नव्हते सदर बकऱ्यांची मृत झाल्यामुळे बकरी मालकांना शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे