३७ गोवंशाना जीवनदान तर तस्कर कोठडीत, २७ लाख मुद्देमाल जप्त

३७ गोवंशाना जीवनदान तर तस्कर कोठडीत, २७ लाख मुद्देमाल जप्त

मागील पाच दिवसात दुसऱ्यांदा धडक कारवाई करत पडली पोलिसांनी कत्तलीसाठी नेण्यात येत असलेल्या गोवंशाची सुटका केली असुन ह्या कारवाईत जवळपास 27 लाख 30 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन 3 तस्करांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या तर 3 तस्कर पळुन जाण्यात यशस्वी ठरले.

सविस्तर वृत्त असे की, पडोली पोलिसांना आयशर वाहनातून गोवंशाची अवैध वाहतूक होणार असून हे गोवंश कत्तलीसाठी लगतच्या तेलंगणा राज्यात जाणार असल्याची गुप्त माहिती प्राप्त झाली होती. सदर माहितीवरून पडोली पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री एम आय डी सी चिंचाळा येथे नाकाबंदी करुन संशयित आयशर क्र. एमएच 34, बी जी 8994 ला थांबवून झडती घेतली असता त्या वाहनात 37 गोवंश निर्दयीपणे कोंबुन अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असल्याचे आढळले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करून शेख बशीर शेख लतीफ (27), रा. गोयेगांव ता वाकडी जी. असीफाबाद, अयाझ खान एजाज खान (19) व शमशाद जैनुद्दीन शाहा (30) दोघेही रा. गडचांदूर अशा तिघांना अटक केली. या कारवाईत सुमारे सत्ताविस लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे तस्करी करताना अडथळा येऊ नये व तस्करीसाठी वापरण्यात येणाऱ्या आयशर वाहनाला संरक्षण मिळावे ह्यासाठी एम एच 34 ए ए 3703 क्रमांकाची मारुती स्विफ्ट कार पायलटिंग करत होती. पोलिसांच्या हे लक्षात येताच त्यांनी सदर कार थांबिण्याचा प्रयत्न केला मात्र कर चालकाने कार दामटण्याचा प्रयत्न केला. अखेरीस पोलिसांनी स्विफ्ट कार अडविली मात्र त्या कार मधे असलेले शाकिर सुलेमान शेख, जुबेर रा. गडचांदूर, साजिद रज्जाक कुरेशी रा. रयतवारि चंद्रपुर हे पळून जाण्यात यशस्वी ठरले तर कार चालक ताब्यात आला. सदर कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, अप्पर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक सुनीलसिंग पवार यांच्या नेतृत्वात कैलास खोब्रागड़े, सुमीत बरडे, प्रतिक हेमके, पंकज किटे, धिरज भोयर, कोमल मोहजे किशोर वाकाटे, यांच्यासह पडोली पोलिसांच्या चमूने केली.