शासन आपल्या दारी उपक्रमाअंतर्गत सॅनीटरी पॅड व्हेंडीग मशीनचे उदघाटन

शासन आपल्या दारी उपक्रमाअंतर्गत सॅनीटरी पॅड व्हेंडीग मशीनचे उदघाटन

 

भंडारा, दि. 12 : शासन आपल्या दारी अभियानाअंतर्गत मुलींची शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे महिलांसाठी युनियन बँक ऑफ इंडिया शाखा तर्फे CSR (सामाजिक उत्तरदायीत्वा तंर्गत निधीतून) अंतर्गत सॅनीटरी पॅड वेंडीग मशीनचे उदघाटन विभागीय व्यवस्थापक, युनियन बँक ऑफ इंडिया एम. व्ही. एन. रविशंकर यांच्या हस्ते करण्यात आले.

 

याप्रसंगी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी व्ही. एम. लाकडे, प्राचार्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जे. व्ही. निंबार्ते, सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सुधाकर झळके, अविनाश ठाकरे, मुकूल गजभिये, मुकेश देवांगन, मॅनेजर युनियन बँक ऑफ इंडिया शाखा, मुख्य मॅनेजर नागपूर वसंत गायकवाड, जिल्हा समन्वय अधिकारी, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ सुहास बोंदरे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

 

यावेळी कार्यक्रमासाठी एकूण 235 महिला उमेदवार होत्या . श्री. अविनाश ठाकरे यांनी सॅनीटरी पॅड वेंडीग मशीनचा वापर कसा करावा याबाबत उपस्थित महिला उमेदवारांना प्रात्यक्षिक दाखवले. श्री. सुधाकर झळके यांनी उपस्थित महिला उमेदवारांना रोजगार/स्वयंरोजगाराबाबत मार्गदर्शन केले. तसेच श्री. सुहास बोंदरे यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ अंतर्गत योजनांची माहिती सांगून योजनेचा जास्तीज जास्त उमेदवारांनी लाभ घेण्याचे आवाहन केले.

 

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन गटनिदेशक विजय कावळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलींची, भंडारा येथील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परीश्रम घेतले.