शबरी आदिवासी कार्यालयातर्फे राबविण्यात येणाऱ्या…

शबरी आदिवासी कार्यालयातर्फे राबविण्यात येणाऱ्या

कर्ज योजने करीता गोंदिया व भंडारा जिल्हयाकरीता लक्षांक प्राप्त

 

भंडारा, दि. 23 मे, : शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ शाखा कार्यालय देवरी अंतर्गत मुख्य कार्यालय नाशिक मार्फत राबविण्यात येणाऱ्या कर्ज योजने करीता गोंदिया व भंडारा जिल्हयाकरीता लक्षांक प्राप्त झाले आहे. या कर्ज योजनेत महामंडळाचा 95% सहभाग तर लाभार्थाचा 5% सहभाग राहणार आहे. या योजनेसाठी विहीत नमुन्यातील अर्ज शाखा कार्यालय देवरी (दुधनाग भवन’, अग्रेसन चौक, आमगांव रोड, देवरी ता. देवरी जि. गोंदिया) येथे उपलब्ध आहे. व्यवसायाचे प्रस्ताव संपुर्ण कागदपत्रासह दिनांक 30 मे 2023 पर्यंत शाखा कार्यालय देवरी येथे कार्यालयीन वेळेत सादर करावे. या मुदतीनंतर आलेले प्रस्ताव स्वीकारले जाणार नाही.

 

गोंदिया व भंडारा जिल्हयातील इच्छुक लाभार्थांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन शबरी आदिवासी वित्त विकास महामंडळ नाशिक शाखा कार्यालय यांनी केले आहे. या कर्ज योजनेतून 1) महिला सशक्तीकरण योजना (रू 2 लक्ष) 6, २) बचतगट योजना (रू 5 लक्ष) 1, 3) कृषी आणि संलग्न व्यवसाय (रू 2 लक्ष) 8, 4) होटेल ढाबा व्यवसाय (रू 5 लक्ष) 2, 5) स्पेअर पार्ट/गॅरेज/ऑटो वर्कशॉप (रू 5 लक्ष) 1, 6) वाहन व्यवसाय (रू 10 लक्ष) 1, 7) लघु उद्योग व्यवसाय (रू 3 लक्ष) 1 असे एकुण 20 लक्षांक प्राप्त झाले असुन उद्यीष्टाच्या प्रमाणात अंतीम मंजुरीसाठी सादर करावयाचे आहे.

 

कर्ज योजनेसाठी व्यवसायाचे प्रस्ताव सादर करतांना जातीचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला (टी.सी.), उत्पन्नाचा दाखला, शैक्षणीक पात्रतेचे कागदपत्रे, आदिवासी विभागाचे नाव नोदनी केल्याचे प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र प्रकल्प अहवाल, रेशन कार्ड, व्यवसायाचे कोटेशन, ड्राईव्हींग लॉयन्सस (वाहन करीता), लाभार्थी व दोन जमीनदारांचा 7/12 किंवा घराचा 8 अ नमुना, दोन फोटो, बॅकेचे कर्ज नसल्याचे दाखले व ग्राम/नप. चे नाहरकत प्रमाणपत्र, इत्यादी कागदपत्रे फाईल सोबत जोडणे आवश्यक आहे त्याशिवाय फाईल घेतली जाणार नाही. अर्जाची किंमत रुपये 10/ – असुन लाभार्थांनी स्वताचे ओळखपत्र / आधार कार्ड दाखवून व्यवसायाचे अर्ज प्राप्त करून घ्यावा प्रतीनिधी पाठवू नये. असे शाखा व्यवस्थापक शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्या. नाशिक शाखा कार्यालय देवरी यांनी प्रसिध्दीव्दारे कळविले आहे. सविस्तर लक्षांक व अटी शर्ती कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर लावण्यात आलेली आहे.